सकाळ संवाद

सकाळ संवाद

Published on

बेवारस कंटेनगर हटवा
चिंचवडगावामधील धनेश्‍वर मंदिराजवळ एक कंटेनर बेवारस अवस्थेत आहे. त्याबाबत वारंवार तक्रारी केल्या. परंतु, खूप दिवसांपासून दुर्लक्ष केले जात आहे. या कंटेनरबद्दल कोणालाही माहिती नाही. मात्र, तो रस्त्यावर असल्यामुळे वाहतुकीस अडचणीचा ठरत आहे.
- अजित घुगरे, दत्तनगर, थेरगाव
PNE26V81727

बंद दिवे चालू करा
जुनी सांगवी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी पुतळ्याच्या परिसरातील दिवे बंद आहेत. एक महिना झाला आहे. परंतु, महानगरपलिकेकडून त्याकडे दुर्लक्ष होत आहे.
- मनोज पवार, पवारनगर, जुनी सांगवी
PNE26V81729

कचरा उचलण्याकडे दुर्लक्ष
चिंचवडमधील तानाजीनगर येथे गेल्या बऱ्याच दिवसांपासून कचरा पेटी खाली कचरा पडलेला आहे. कचरावेचक घंटागाडी वाल्यांना सांगूनही ते खाली पडलेला उचलून नेत नाहीत. कृपया, आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याबाबत संबंधितांना निर्देश द्यावेत.
- माधवी खानोलकर, तानाजीनगर, चिंचवड
PNE26V81729


रस्त्यातील डी.पी. दूर करा
पिंपळे निलख येथील सिटी सर्व्हे क्र. ३६८ विठ्ठल मंदिराजवळ महावितरणचा डी.पी. नियोजित रस्त्यामध्ये आहे. स्थापत्य विभाग व महावितरण विभाग यांनी योग्य ती कार्यवाही करुन रस्त्यातील हा डी.पी.दूर करावा.
- एक वाचक
PNE26V81728

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com