अजित पवार म्हणाले...

अजित पवार म्हणाले...

Published on

अजित पवार यांचे टीकास्त्र...
- शहरात लुटारूंच्या टोळ्या दिवसाढवळ्या वावरत आहेत
- शरद पवार यांनी पिंपरी चिंचवडमध्ये विकासाला गती दिल्याचा दाखला
- शहरातील काहींच्या संपत्ती कशी काय वाढली? कुठून पैसा आला?
- त्यावेळच्या पदाधिकाऱ्यांनी कुत्र्यांच्या नसबंदीतही पैसे खाल्ले
- भ्रष्टाचाराच्या राक्षसाचे दहन करण्यासाठी आम्ही मैदानात उतरलो आहोत
- आजवर जमीन माफिया, भंगार माफिया आता शहरात खोदाई माफिया
-------------
कर्जरोखे काढून कोट्यवधी कर्ज
‘‘महापालिकेच्या २०१७ पूर्वी सुमारे पावणेपाच हजार कोटींच्या ठेवी होत्या. आता त्या दोन हजार कोटींवर आल्या आहेत. या ठेवी वाढायला हव्या होत्या. इतकंच नव्हे, तर कर्जरोखे काढून कोट्यवधींचे कर्ज केले आहे. ‘रिंग’ करून पैसे लाटले गेले. रस्ते अरुंद केल्याने वाहतूक कोंडी वाढली आहे,’’ असे पवार म्हणाले.

भाजपची भूक राक्षसी
‘‘भाजपची राक्षसी भूक मला पाहवत नाही. सर्वत्र हफ्तेखोरी सुरू आहे. गेल्या नऊ वर्षांत भाजपच्या सत्ता काळात दादागिरी वाढली. मी पुरावे देईन. कोणावरही बिनबुडाचे आरोप करणार नाही,’’ अशा शब्दांत पवार यांनी भाजपवर जोरदार टीका केली.

सत्तेची मस्ती आणि नशा
अजित पवारांनी यावेळी भाजपच्या स्थानिक आमदार आणि पदाधिकाऱ्यांवर टीका करत धुलाई केली. ‘‘त्यांना
सत्तेची मस्ती आणि नशा आली आहे. आमच्या उमेदवारांना अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकण्यात येत आहे,’’ असा दावाही त्यांनी केला.

शरद पवार यांच्याकडून विकासाला गती
फेब्रुवारी २०२५ मध्ये निवडणूक व्हायला पाहिजे होती. पुणे शहर बदलत गेले, मला अनेक नेत्यांनी आशीर्वाद दिले. १९९२ ची निवडणूक लढवली तेव्हापासून सर्वांना विश्वासात घेऊन काम काम करू लागलो. १९९२ ते २०१७ पर्यंत मी पिंपरी चिंचवड शहराचा कायापालट केला. हवा तो विकास केला. मात्र, २०१७ मध्ये मोदी लाट आली आणि सर्व बाजूला गेले. शरद पवारांनी पिंपरीत विकासाला कशी गती दिली, असे गौरवोद्‍गार अजित पवार यांनी काढले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com