व्यवस्थापन संस्थांची प्रचारात उडी
सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. ११ ः महापालिकेच्या निवडणुकीत प्रस्थापित नगरसेवकांसह नवे उमेदवारही आपले नशीब आजमावत आहेत. पॅनेल पद्धतीने निवडणूक होणार असल्याने, अनेकांनी व्यवस्थापन संस्थांना निवडणूक नियोजनासाठी हाताशी धरले आहे. या व्यवस्थापक संस्थांकडून नव्या उमेदवारांसोबत प्रस्थापित नगरसेवकांना प्रभागातील मतदारांचा बदलता कल, प्रचार साहित्य आणि कार्यकर्ते पुरवले जात आहेत.
महापालिका निवडणुकीसाठी नव्याने आरक्षण सोडत निघाल्यामुळे काही उमेदवारांनी पत्नी, मुलगी व सून अशा घरातील महिलांना संधी दिली; परंतु एकेकाळी बलाढ्य समजली जाणारी सर्व मातब्बर नेते मंडळी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात आल्यामुळे राजकीय समीकरणेही बदलली आहेत. तसेच निवडणुकीतील विजयाचे समीकरण बदलले आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीतही काहींनी लोकसभा व विधानसभा निवडणुकांप्रमाणेच राजकीय व्यवस्थापन संस्था नियुक्त केल्या आहेत. या संस्थांना काही नगरसेवकांनी स्वतःच्या प्रभागासहीत मतदारसंघातील यादी तयार करण्याचे काम सोपवले आहे. या संस्था डोअर टू डोअर जाऊन नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद साधून, एका सॉफ्टवेअरमध्ये सर्व माहिती तयार करून देत आहेत. अगदी मतदारांच्या नावांपासून ते वय, पत्ता, जात व प्रांतनिहाय माहिती उमेदवारांना व्यवस्थापन संस्थेमार्फत उपलब्ध होत आहे. ही माहिती नगरसेवकांना मोबाईलवर एका टचवर उपलब्ध होत आहे.
------
काय करतात संस्था ?
प्रचारात कार्यकर्त्यांनी काय काम करावे, उमेदवारांनी लोकांपर्यंत कसे पोहोचावे, प्रचाराचे नियोजन, सोशल मीडियावरील प्रचार, समाजमाध्यमांचा प्रचारात वापर कसा करावा, मतदारसंघातील कोणते महत्त्वाचे मुद्दे, राजकीय अभियान या व्यवस्थापन संस्था राबवत आहेत. डोअर टू डोअर सर्वे करून, ही माहिती ॲप्सद्वारे उमेदवाराला पुरविली जाते. कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण, बूथ कमिटीचे व्यवस्थापन केले जाते. कार्यकर्ते पुरवले जातात. तसेच प्रचारसाहित्यही पुरवले जात आहे.
-----
फोटो
84442
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

