

पिंपरी, ता. १३ : पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी बुधवारी (ता. १४) मतपेटी वाटप, गुरुवारी (ता. १५) मतदान प्रक्रिया तसेच शुक्रवारी (ता. १६) मतमोजणी होणार आहे. ही सर्व प्रक्रिया सुरळीत व सुरक्षितरित्या पार पडण्यासाठी मतदान केंद्रे, मतपेटी वाटपाचे ठिकाण तसेच मतमोजणीच्या ठिकाणी वाहतूक कोंडी होवू नये, यासाठी या परिसरातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली आहे.
वाहतूक बंदचे मार्ग व कंसात पर्यायी मार्ग पुढीलप्रमाणे :
(ता. १४ रात्री बारा ते ता. १६ रात्री बारापर्यंत)
- भोसरीतील इंद्रायणीनगर येथील वैष्णवी माता मंदिर रस्ता येथून संत ज्ञानेश्वर क्रीडांगण रस्ता (पुणे-नाशिक मार्गाने अथवा सहारा चौक मार्गे)
- इंद्रायणी स्वीट कॉर्नर चौक येथून संत ज्ञानेश्वर क्रीडांगण रस्ता (इंद्रायणी कॉर्नर चौक अथवा विश्वेश्वर चौक, खंडेवस्ती मार्गे)
- चिखलीतील कृष्णानगर भाजी मंडई चौक, पवार वस्ती, हरगुडे वस्ती येथून सेवा रस्त्याने टाऊन हॉल घरकुल, चिखली येथे येणाऱ्या वाहनांना प्रवेश बंद (ही वाहने साने चौक, नेवाळे वस्ती येथून जातील)
- पूर्णानगर येथून सेवा रस्त्याने टाऊन हॉल घरकुल येथे येणारा रस्ता (कृष्णानगर भाजी मंडई मार्गे )
- निगडीतील छत्रपती संभाजी महाराज चौकाकडून पोलिस चौकीसमोरील रस्त्याने प्राधिकरणातील हेडगेवार भवनच्या दिशेने जाणारा रस्ता (हेडगेवार भवन समोरील रस्त्याने विरुद्ध दिशेने हुतात्मा चौकातून जातील)
- बालेवाडी परिसरातील म्हाळुंगे गाव येथील गोदरेज सर्कल ते राधा चौक या रस्ता (चांदे नांदे बाजूकडून येणारी वाहने गोदरेज सर्कल येथून डावीकडे वळून माण व हिंजवडी मार्गे)
- बाणेर तसेच राष्ट्रीय महामार्गावरून येणारा रस्ता (राधा चौकातून उजवीकडे वळून वाकड नाका मार्गे)
- बालेवाडी क्रीडा संकुलाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील उत्तम स्वीट चौक ते म्हाळुंगे पोलिस चौकी रस्ता (उत्तम स्वीट येथून उजवीकडे वळून म्हाळुंगे पोलिस चौकीपासून पुढे मुख्य रस्त्याने राधा चौक मार्गे)
- थेरगाव परिसरातील तापकीर चौक बाजूकडून थेरगावकडे येणारा रस्ता (एम. एम. चौक मार्गे)
- बापूजी बुवानगर (काळेवाडी फाटा) ते तापकीर चौक, दिलीप वेंगसकर ॲकॅडमी चौक ते तापकीर चौक व बारणे कॉर्नर चौक ते तापकीर चौक रस्ता (डॉ. बाबासाहेब आंबेडकर रस्ता मार्गे)
- कासारवाडी परिसरातील वरूण हॉटेल येथून विसावा हॉटेलकडे जाणारा रस्ता (कासारवाडी रेल्वे क्रॉसिंग समोरील स्मशानभूमी मार्गे)
- कासारवाडी ज्ञानराज शाळा ते सुखवानी आकाशदीप सोसायटी रस्ता (सितांगण गार्डन दत्तमंदिर मार्गे)
- भोसरी गावठाण बापूजी बुवा चौक ते भोसरी स्मशानभूमीकडे जाणारा रस्ता (भोसरी स्मशानभूमी गावजत्रा मैदान तसेच बापूजी बुवा चौक मार्गे)
(१४ जानेवारी सकाळी सहा ते दुपारी एक तसेच १५ जानेवारीला सायंकाळी सहा ते रात्री बारापर्यंत)
- वाकड परिसरातील रक्षक चौकाकडून काळेवाडी फाट्याकडे जगताप डेअरी पुलावरून जाणारा रस्ता (जगताप डेअरी चौकातून बीआरटीमधून काळेवाडी फाट्याकडे वाहने जातील. तसेच जगताप डेअरी चौकातून डावीकडे वळून कस्पटे चौक मार्गे वाहने इच्छितस्थळी जातील. तर उजवीकडे वळून कोकणे चौकमार्गे वाहने इच्छितस्थळी जातील.
(१५ जानेवारी पहाटे पाच ते रात्री आठपर्यंत)
- मोशी गावठाण परिसरातील पुणे-नाशिक महामार्गावरील बोऱ्हाडेवाडी चौक ते मातेरे हाऊस चौक रस्ता (पांजरपोळ चौक किंवा भारतमाता चौक मार्गे)
- मातेरे हाऊस चौकातील वाहने आरटीओ रस्त्याने जातील
- मोशी चौक ते हवालदार वस्ती चौक रस्ता (भारतमाता चौक येथून जातील)
- चऱ्होली परिसरातील साठेवस्ती ते वाघेश्वर चौक रस्ता (कोतवाल वस्ती मार्गे)
- शीतल फॅब्रिकेशन ते वाघेश्वर चौक रस्ता (बुर्डे वस्ती मार्गे)
- चऱ्होली स्वीट मार्ट ते वाघेश्वर चौक रस्ता (कुंभारवाडा किंवा
स्मशानभूमी मार्गे)
- वाघेश्वर कृषी सेवा केंद्र ते वाघेश्वर चौक रस्ता (स्मशानभूमी मार्गे व बुर्डे वस्ती मार्गे)
(१६ जानेवारी सकाळी सहा ते रात्री नऊपर्यंत)
- चिंचवड, ऑटो क्लस्टर परिसरातील राजमाता जिजाऊ चौक ते काळेवाडी एम्पायर पूल तसेच एम्पायर सोसायटीकडे जाणारा रस्ता (आयुक्त बंगल्यापासून राजमाता जिजाऊ चौकातून उजवीकडे वळून बसवेश्वर चौक मार्गे तसेच राजमाता जिजाऊ चौकातून डावीकडे वळून मोरवाडी मार्गे)
---