सकाळ संवाद
रस्त्याच्या मध्ये फांदीमुळे धोका
आकुर्डी रेल्वे स्थानकाच्या पुढे असलेल्या आकुर्डी पोलिस चौकीपासून संभाजी चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील सेक्टर क्रमांक २७, प्लॉट क्रमांक ८१ समोर दुभाजकामधून एक झाडाची जाड फांदी मध्ये आली आहे. संध्याकाळनंतर ही फांदी दिसत नाही. त्यामुळे दुचाकी वाहनचालकांना धोका निर्माण झाला आहे. त्यातून अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. मागील आठवड्यात याच रस्त्यावरून दुचाकीवरून जाताना ही फांदी माझ्या डोक्याला लागली. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने रस्त्यामध्ये आलेली ही झाडाची धोकादायक फांदी ताबडतोब तोडून बाजूला करावी.
- विलास खरे, रावेत
---
स्मार्ट सिटीची कामे कुणाच्या फायद्यासाठी ?
रावेत येथील एस. बी. पाटील पब्लिक स्कूल ते भोंडवे एम्पायर दरम्यान रस्ता मुळात महानगरपालिकेच्या ताब्यात नाही. त्यातही रस्ता अर्धवट स्थितीत आहे. त्यानंतरही स्थापत्य विभागाने स्मार्ट सिटी अंतर्गत अर्बन स्ट्रीट पद्धतीने पदपथ करून त्या कामावर अक्षरशः लाखो रुपये वाया घालवले आहेत. ह्या पदपथाची अत्यंत दुरवस्था झाली आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पातील कामे कुणाच्या फायद्यासाठी केली जातात, असा प्रश्न त्यामुळे निर्माण होतो. या पदपथाचा नागरिकांना काहीही फायदा नाही. त्याऐवजी इतर ठिकाणच्या पदपथांची दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत होती. परंतु त्याकडे सोईस्करपणे दुर्लक्ष केले गेले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.
- प्रदीप गायकवाड, नवी सांगवी
---
मोशीतील कोंडीवर ठोस उपाय हवा
पुणे - नाशिक महामार्ग क्रमांक ६० वरील मोशी परिसरात रोज सकाळी आणि सायंकाळी होणारी प्रचंड वाहतूक कोंडी होते. त्यामुळे ही समस्या नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरली आहे. रस्त्यावरील अव्यवस्थित नियोजन ही या कोंडीची मुख्य कारणे आहेत. चाकण एमआयडीसीमुळे अवजड वाहनांची वर्दळ वाढली आहे. या समस्येवर तात्पुरता उपाय म्हणून अवजड वाहनांवर निर्बंध घालण्यात आले आहेत, तरी या समस्येवर लवकरात लवकर कायमस्वरूपी ठोस उपाय काढणे आवश्यक आहे.
- वसंत गायकवाड, मोशी
---
रस्त्यावरील खडीचे आव्हान का ?
तळेगाव दाभाडे येथील अनेक रस्त्यांवरील साइड पट्ट्या व खड्डे भरले गेले आहेत. पण बारीक खडी वर टाकली गेली आहे. त्यापेक्षा चांगल्या रस्त्यावर बारीक वाळू आणि डांबर टाकून रस्ता केला असता तर तो एकसंध दिसला असता. आता बारीक खडीमुळे त्यावरून दुचाकी वाहने घसरून अपघात होत आहेत. नागरीकांनी या खडीच्या आव्हानाला सामोरे जावे, अशी प्रशासनाची इच्छा आहे का ?
- प्रकाश वा. दातार, यशवंत नगर, तळेगाव दाभाडे
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

