मकरसंक्रांती सण एक, पद्धती अनेक
पिंपरी, ता. २३ : पौष महिन्यात येणारा मकर संक्रांतीचा सण हा प्रेम, स्नेह आणि नात्यातील गोडवा वाढवणारा म्हणून ओळखला जातो. ‘उत्तरायण’, ‘पोंगल’, ‘लोहरी’ अशा नावांनीदेखील हा सण साजरा होतो. पिंपरी चिंचवड शहरात देशभरातील नागरिक येऊन स्थायिक झालेले आहेत. त्यामुळे शहरातही या सणामध्ये मोठी वैविध्यता दिसून येते.
तिळगुळाचा गोडवा व वाण लुटण्याचा उत्साह
महाराष्ट्रात ‘तिळगुळ घ्या, गोड गोड बोला’ असे म्हणत संक्रांतीदिवशी एकमेकांना तिळाचे लाडू व हलवा दिला जातो. शेतात आलेले पीक निसर्गाला पहिल्यांदा अर्पण करण्याची पद्धत असल्याने या दिवशी विविध भाज्यांचा व धान्यांचा ओवसा देवाला अर्पण केला जातो. थंडीच्या दिवसांमध्ये शारीरिक स्निग्धता टिकून रहावी यासाठी तीळ, बाजरीची भाकरी व गोडाधोडाच्या पदार्थांचे सेवन केले जाते.
उत्तरायणचा आनंद पगंतोत्सवाने
‘‘विविध भाज्या वापरून बनवलेला ‘उंधिओ’, गोडाचा पदार्थ म्हणून गाजराचा हलवा, मुरमुऱ्यांच्या लाडूचे सेवन हा गुजराती बांधवांचा ‘उत्तरायन’या सणाचा खास बेत असतो. दिवसभर पतंग उडवणे, सायंकाळी आकाशदिवे सोडणे, एकमेकांच्या घरी गरबा खेळणे अशा वातावरणात हा सण साजरा होतो. मकर संक्रांतीला सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. तसेच सूर्याचे उत्तरायण सुरू होते. त्यामुळे या दिवसाला गुजराती बांधव ‘उत्तरायण’ म्हणून साजरा करतात,’’ असे पुनावळे येथे राहणाऱ्या तृप्ती पांड्या यांनी सांगितले.
उत्तर भारतीयांमध्ये ‘खिचडी’चा नैवेद्य
‘‘उत्तर भारतीय बांधव या दिवशी डाळ-तांदळाची खिचडी, तिळकूट यांचा नैवेद्य दाखवून मकर संक्रांत साजरी करतात. तसेच ‘दहीचुडा’ हा गोडाचा पदार्थ बनविला जातो. सुवासिनी देवाला विविध भाज्या अर्पण करतात. एकमेकांना तिळकूट वाटून मकर संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या जातात,’’ असे सांगवी येथे राहणाऱ्या सलोनी सिंह यांनी सांगितले
तमिळ बांधवांचा पोंगल
शेतात येणाऱ्या पिकाचा कापणी उत्सव म्हणजेच तमिळनाडूमध्ये साजरा केला जाणारा ‘पोंगल’ होय. दक्षिण भारतात मुख्यत्वे तांदूळ हे पीक येते. त्यामुळे कापणीनंतर तांदूळ, दूध व गुळापासून तयार करण्यात आलेला पोंगल या पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातात. १४ जानेवारीपासून सुरू होणारा हा सण चार दिवस साजरा होते. घराची स्वच्छता करून सजवणे, पोंगलचा नैवेद्य दाखवणे व आपल्या आप्तेष्टांच्या भेटीगाठी या दिवशी घेतल्या जातात.
‘मकर संक्रांतीचा सण सर्व प्रांतांत साजरा केला जाते. या दिवसापासून थंडी कमी होऊन उष्णता वाढू लागते. त्यामुळे आरोग्यास उत्तम असणारे तिळगूळ, तिळाचे लाडू एकमेकांना वाटण्याची पद्धत आहे. या दिवशी पतंगही उडवले जातात. मात्र, त्यामुळे इतरांना इजा होणार नाही याची काळजी घ्यावी. या काळात मिळणाऱ्या भाज्यांचे सेवन करावे. त्या खाल्ल्या जाव्यात म्हणूनच त्यापासून विविध पदार्थ करण्याची पद्धत आहे.
- डॉ. अबोली धुमाळ, वैद्यकीय तज्ज्ञ
PNE26V85332
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

