तुरळक प्रकार वगळता उत्साह

तुरळक प्रकार वगळता उत्साह

Published on

‘ब’ क्षेत्रीय कार्यालय

पिंपरी, ता. १५ ः चिंचवड आणि काळेवाडी परिसरातील तीन ठिकाणी मतदान यंत्रातील बिघाडाचे किरकोळ प्रकार वगळता ‘ब’ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात गुरुवारी (ता. १५) मोठ्या उत्साहात मतदान पार पडले. नागरिकांनी मतदान केंद्रांबाहेर सकाळ पासूनच गर्दी करायला सुरवात केली होती. दुपारी एकनंतर काही ठिकाणी मतदान रेंगाळले. मात्र सायंकाळनंतर मतदान केंद्रावर गर्दी होती. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि तरुणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या क्षेत्रीय कार्यालयांतर्गत प्रभाग १६ रावेत-किवळे-मामुर्डी, प्रभाग १७ दळवीनगर-वाल्हेकरवाडी, प्रभाग १८ चिंचवड तानाजीनगर आणि प्रभाग २२ काळेवाडी-विजयनगर या भागांचा समावेश होतो. कामगारांनी आणि व्यावसायिकांनी मतदानासाठी मतदान केंद्राबाहेर रांगा लावल्या होत्या. पहिल्या टप्‍यात ज्येष्ठांची संख्या अधिक होती.
व्होटर स्लीप मिळाली नसल्यामुळे मतदान केंद्रच माहिती नसल्याचे अनेकांनी सांगितले. मतदार यादीत नावे शोधण्यासाठी केंद्राबाहेर नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. मतदारांना मोबाईल ठेवण्याची स्वतंत्र व्यवस्था होती. अनेकांनी या सुविधेचा लाभ घेतला. मतदारांना मतदान केंद्रापर्यंत घेऊन येण्यासाठी कार्यकर्त्यांची धावपळ पाहायला मिळाली. काही पक्षांच्या उमेदवारांनी ज्येष्ठांसाठी रिक्षाची व्यवस्था केली होती. विधानसभेला निवडणुकीचा हक्क बजावला, पण महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीत नावच नसल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी भगव्या, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची गुलाबी रंगाची वेशभूषा केली होती. ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळी रांग होती. पिंपळवन निसर्ग संवर्धन ग्रुपतर्फे मतदानाचा हक्क बजावणाऱ्यांना रोपे वाटण्यात आली.

क्षणचित्रे
- कन्या प्रशाला केंद्रात मतदान यंत्रात बिघाड झाल्याने २०-२५ मिनिटे मतदान प्रक्रिया थांबवली
- हुतात्मा चापेकर विद्यामंदिर केंद्रातही मतदान यंत्रात बिघाड झाल्यामुळे दुसऱ्याच पक्षाच्या बटणासमोरील लाइट लागत असल्याच्या चर्चेने तणाव
- मतदार यादीतील नावे शोधण्यासाठी नागरिकांची वेगवेगळ्या मतदान केंद्रांवर धावपळ
- प्रभाग २७ मधील काहींची नावे २२ मध्ये तर २२ मधील काहींची नावे प्रभाग २७ मध्ये आल्याने नागरिकांचा रोष

PNE26V86070

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com