नवमतदारांमध्ये सळसळता उत्साह

नवमतदारांमध्ये सळसळता उत्साह

Published on

सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १५ ः निवडणुकीसाठी प्रथमच मतदानाचा हक्क बजावणाऱ्या नवमतदारांमध्ये उत्साह दिसून आला. शहरातील वेगवेगळ्या मतदान केंद्रावर जाऊन त्यांनी आयुष्यात प्रथमच मतदान केले. जनतेच्या हिताचे काम करणारे नगरसेवक निवडण्यासाठी आपण मतदान करणे गरजेचे आहे. मुळात मतदान करणे हे आपले कर्तव्यच आहे, असे नेहमी ऐकत आलो होतो. आज महापालिका निवडणुकीसाठी प्रत्यक्ष मतदान करण्याची संधी मिळाल्याचा आनंद काही वेगळाच होता, अशा भावना या नवमतदारांनी व्यक्त केल्या.
ज्येष्ठांसह तरुणांनीही मतदानाचा हक्क बजावला. यात नवमतदारांची संख्या लक्षणीय होती. पहिल्यांदा मतदान करणारे काही जण पालकांबरोबर आले होते. तर काहीजण महाविद्यालयीन मित्र-मैत्रींणींचा ग्रुप करून मतदान केंद्रावर आले होते. पहिल्यांदा मतदान झाल्यावर काहींना सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. मतदान प्रक्रिया कशी असेल, मतदान कसे करावे, किती जणांना मतदान करायचे या आणि अनेक प्रश्‍न पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांना सतावत होते. पण, मतदान केंद्रातील अधिकाऱ्यांनी केलेल्या सहकार्यामुळे अनेकांना पहिल्यांदा मतदान करने सोईस्कर झाल्याचे तरुणांनी सांगितले.
------
मतदान करताना शहराचा आणि प्रभागाचा विकास करणाऱ्या पक्षाला आणि उमेदवाराला मतदान करण्याचा विचार केला होता पहिल्यांदाच मतदान करत असल्यामुळे मतदान करताना धाकधूक होती. पण, मतदान करतानाचा चांगला अनुभव होता.
- प्रणिती घोडे, काळेवाडी
----
मतदान करतानाचा अनुभव वेगळाच होता. सर्वसामान्यांचे प्रश्‍न सोडविणाऱ्या उमेदवाराला मतदान करण्याचे ठरविले होते.
- आदिती श्रेया, चिंचवड
----
मतदान प्रक्रियेची तेथील कर्मचाऱ्यांनी चांगली माहिती दिल्यामुळे कोणतीही अडचण आली नाही. पहिल्यांदा मतदान करताना खूप छान वाटले.
- आलिया शेख, मोरवाडी
----
सर्वसामान्यांच्या मदतीला धावून येईल असा नगरसेवक असावा हा विचार करून मी मतदान केले. मतदानाचा अधिकार मिळाला या विचारानेच खूप आनंद झाला होता.
- आदिती पवार, काळेवाडी
----
पहिल्यांदा मतदान असल्यामुळे थोडी भीती होती. पण तेथे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांनी सहकार्य केले. प्रभागाचा विकास डोळ्यासमोर ठेवून उमेदवाराला मतदान केले.
- स्वाती मोरे, पिंपरीगांव 
----
नवीन मतदान करण्याची आता आणखी एक जबाबदारी वाढली आहे. मतदान करताना कोणतीही अडचण आली नाही. मतदानासाठी उत्तम व्यवस्था केली होती. खूप चांगला अनुभव होता.
- पुष्कर कदम, काटे पूरम चौक, नवी सांगवी
----
मतदान केंद्रावर माहिती देण्यासाठी कर्मचारी होते. त्यामुळे काही अडचण आली नाही. मी मतदान करताना उमेदवाराने केलेली कामे आणि भविष्यात काय कामे करणार याचा विचार करून मतदान केले.
- प्रणव कदम, पिंपळे गुरव
----
शहराचा विकास डोळ्यासमोर ठेवून उमेदवाराला मतदान केले. मतदान केंद्रावर सर्व सुविधा होत्या. मतदान करताना अधिकाऱ्यांनी देखील खूप सहकार्य केले.
- सिद्धेश थोरात, गांगुर्डे नगर, पिंपळे गुरव
----
पहिल्यांदाच मतदान करताना खूप छान वाटले. मतदान करण्याचा अधिकार मिळाला असल्यामुळे आज मतदान करून मी बजावला आहे.
- अनिमेश देशपांडे, पिंपळे गुरव
-----
85929
85930
85931
85933
85934
85935
85937
85938
85940

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com