पिंपरी चिंचवडमध्ये ६० टक्के मतदान

पिंपरी चिंचवडमध्ये ६० टक्के मतदान

Published on

पिंपरी, ता. १५ ः पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी (ता. १५) शांततेत मतदान झाले. काही केंद्रांवर सायंकाळीही रांगा लागल्या होत्या. साडेपाच वाजेपर्यंत मतदान केंद्रावर प्रवेश केलेल्या सर्व मतदारांना मतदानाचा अधिकार बजावता आला. ३२ प्रभागांतील १२८ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सुमारे ६० टक्के मतदान झाले.
शहरातील दोन हजार ६७ केंद्रांवर सुमारे सव्वा दहा लाख मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. काही केंद्रांवरील अपवाद वगळता मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडली.

मतदान केंद्र व नावांमुळे गोंधळ
मतदानादरम्यान काही केंद्रांवरील वीजपुरवठा खंडित झाल्याने, तर काही केंद्रांवरील मतदान यंत्र बिघडल्याने मतदान प्रक्रिया थोडा वेळ थांबली होती. यादीत नाव सापडत नसल्याने मतदारही संभ्रमात होते. अनेक प्रभागांमध्ये मतदान केंद्र बदलल्याने काही मतदारांना एका केंद्रावरून दुसऱ्या केंद्रावर जावे लागले. त्यामुळे त्यांचा वेळ, संयम आणि उत्साहाची कसोटी लागली. ताथवडेतील नृसिंह विद्यालय केंद्रावर विद्युत पुरवठा खंडित झाला होता. पाच मिनिटांत जनरेटर सुरू करून मतदान पुन्हा सुरळीत झाले. निगडीतील कॅम्प एज्युकेशन शाळेत मतदारांना वेगवेगळ्या केंद्रांवर नाव शोधत फिरावे लागले. नावे सापडत नसल्याच्या तक्रारी काळेवाडीतून आल्या. थेरगाव गणेशनगर आणि मंगलनगर येथील कांतिलाल खिंवसरा शाळेतील दोन मतदान केंद्रांमुळेही गोधळ उडाला. केंद्रांचे नाव एकच असल्याने योग्य केंद्र शोधण्यात वेळ गेला. लांब अंतरावरील मतदान केंद्रामुळे चऱ्होली, वडमुखवाडी, जाधववाडीतील सोसायट्यांमधील मतदारांनी नाराजी व्‍यक्‍त केली.

दृष्टिक्षेपात
- प्रत्येक केंद्रावर दोन सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीत मतदान प्रक्रिया झाली
- काही ठिकाणी मतदान यंत्र बंद पडल्याचे प्रकार घडले, दुरुस्तीनंतर पुन्हा सुरू
- भाजपचे आमदार महेश लांडगे, शंकर जगताप, उमा खापरे, अमित गोरखे यांची प्रतिष्ठा पणाला
- प्रभाग २४ थेरगाव गुजरनगरमध्ये एबी फॉर्म वेळेत दाखल न केल्याने भाजपचे तीन व शिवसेनेचा एक उमेदवार अपक्ष ठरले, तिथे चिन्ह चालले की उमेदवार हे बघणे उत्सुकतेचे ठरणार
- शिवसेना खासदार बारणे यांनी स्वतःच्या मुलासह पुतण्यालाही उमेदवारी दिल्याने प्रतिष्ठा पणाला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com