सकाळ संवाद
दुभाजकाचे ब्लॉक्स हलवा
चऱ्होली फाटा येथील सिद्धिविनायक हॉटेलजवळील सेवा रस्त्यावर सिमेंट दुभाजकाचे ब्लॉक्स एकत्र जमा करून ठेवले आहेत. महापालिकेच्या स्थापत्य भागाला तक्रार नोंदवली. पण, त्यांचे म्हणणे आहे हे मुख्य कार्यालयाचे काम आहे. मुख्य कार्यालयाला तक्रार केली तरी अद्याप काम झालेले नाही. या ठिकाणी संध्याकाळच्यावेळेस सेवा रस्त्याला जाताना येताना खूप मानसिक त्रास सहन करावा लागतो. हे ब्लॉक्स त्वरित हटवावेत किंवा त्याद्वारे दुभाजक तयार करावा. त्याने नागरिकांची गैरसोय दूर होईल.
- ॲड. प्रभाकर तावरे-पाटील, चऱ्होली फाटा
PNE26V87569
सांडपाणी रस्त्यावर
गेल्या २ ते ३ दिवसांपासून सांडपाणी रावेत, चंद्रभागा कॉर्नर, सर्व्हे क्र. ७५ मध्ये संपूर्ण रस्त्यावर वाहत आहे. त्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून नागरिकांना रस्त्यावरून चालणेही अवघड झाले आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तत्काळ लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी.
- समाधान गायकवाड, रावेत
PNE26V87580
नवीन पेव्हिंग ब्लॉक्स बसवा
पिंपरी येथील अजमेरा कॉलनीमध्ये स्मार्ट सिटी अंतर्गत नवीन पेव्हिंग ब्लॉक्स (गट्टू) बसविण्यात आले होते. परंतु ते गट्टू खराब झाले आहेत. महापालिका प्रशासनाने गट्टू नवीन लावावेत.
- अशोक मंगल, अजमेरा कॉलनी
PNE26V87579
कचऱ्याचा ढीग उचलावा
गेल्या अनेक दिवसांपासून पदपथावर कचऱ्याचा ढीग पडलेला आहे. मात्र, स्वीपर मशिन असो, सफाई कर्मचारी अथवा कचऱ्याची घंटागाडी कोणीही हा ढीग उचलून नेत नाही. मग, येथील कचरा उचलणार तरी कोण? असा प्रश्न मोशीतील पेठ क्रमांक ६ मधील स्थानिकांनी उपस्थित केला आहे.
- एक वाचक
PNE26V87573
धोकादायक झाड काढा
निगडी प्राधिकरण सेक्टर २७ अ श्रीखंडे डोळ्यांच्या दवाखान्यासमोरील रस्त्यावर असलेले झाड धोकादायक आहे. हे झाड पूर्णपणे एका बाजूने वाकलेले असून वाहतुकीच्यादृष्टीने अडथळा निर्माण करत आहे. त्यामुळे येथे खासगी बस आणि ट्रकचे नुकसान झाले आहे. हा मार्ग वर्दळीचा असून वाहतुकीच्यादृष्टीने महत्त्वाचा आहे. सारथीवर तक्रार करून देखील कारवाई झालेली नाही. या ठिकाणी पाहणी करुन योग्य ती कार्यवाही करण्यात यावी.
- सिराज शेख, निगडी
PNE26V87568
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

