

पिंपरी, ता. १२ : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त १५ ते १९ फेब्रुवारीदरम्यान शहरात विविध ठिकाणी ‘छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६’ आयोजित केले आहे. यात प्रामुख्याने ‘शिवगर्जना’ महानाट्य, ‘शिवशंभो गर्जना’, ‘शाहिरी कार्यक्रम’, ‘यशाचा नवा मंत्र-शिवमंत्र’, विविध विषयांवर व्याख्याने, पोवाडे, विविध स्पर्धा आणि रक्तदान शिबिरांचा समावेश आहे, अशी माहिती महापौर रवी लांडगे यांनी दिलीछ
छत्रपती शिवरायांच्या कार्याचा व व्यापक विचारांचा प्रचार, प्रसार करण्यासाठी महापालिकेने या उपक्रमांचे आयोजन केले आहे. या विचार प्रबोधन पर्वाचे उद्घाटन शनिवारी (ता. १५) सायंकाळी सहा वाजता महापौर रवी लांडगे यांच्या हस्ते निगडीतील भक्तीशक्ती समूहशिल्प उद्यानात होईल. यावेळी नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती असेल. प्रबोधन पर्वातील सर्व कार्यक्रम पर्व काळात दररोज सायंकाळी सात वाजता सुरू होतील. कार्यक्रम सर्व नागरिकांसाठी खुले व विनामूल्य आहेत.
निगडीतील कार्यक्रम
१५ फेब्रुवारी ः अभिजीत जाधव आणि आमु जाधव यांचा ‘शिवशंभो गर्जना’
१६ फेब्रुवारी ः शाहीर प्रकाश ढवळे, अशोक कामथे, बाळासाहेब मालुसकर, चैतन्य काजुळकर, जालिंदर शिंदे, लीना देशपांडे, वनिता मोहिते, कांचन जोशी, प्रचिती विष्णूरकर, स्मिता बांदिवडेकर, चित्रा कुलकर्णी, उज्वला जाधव, राजरत्न पांडगळे, घनशाम कुदळे हे छत्रपती शिवाजी महाराज यांना शाहिरीच्या माध्यमातून मानवंदना देतील.
संभाजीनगर येथील कार्यक्रम
(सर्व कार्यक्रम कमलनयन बजाज शाळेजवळ दररोज सायंकाळी ७ वाजता)
१७ फेब्रुवारी : डॉ. विजय तनपुरे यांचा ‘यशाचा नवा मंत्र-शिवतंत्र’ हा शाहिरी कार्यक्रम.
१८ फेब्रुवारी : इतिहास अभ्यासक नितीन बानुगडे पाटील यांचे ‘छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक’ विषयावर व्याख्यान.
१९ फेब्रुवारी : अविनाश भारती यांचे ‘आदर्श राजे : छत्रपती शिवाजी महाराज’ विषयावर व्याख्यान
एचए कॉलनी, पिंपरी
१९ फेब्रुवारी : ‘छत्रपती शिवाजी महाराज - एक आदर्श राजे’ विषयावर व्याख्यान. भारत इतिहास संशोधन मंडळाचे सदस्य बालाजी काशिद आणि दस्तगीर काझी यांचा सहभाग.
डांगे चौक, चिंचवड
१७ फेब्रुवारी : शाहीर सुरेश सूर्यवंशी आसंगीकर व सहकारी ‘छत्रपती शिवाजी महाराज’ यांच्या जीवनावर आधारित पोवाडा सादर करतील
१८ फेब्रुवारी : भरत पांगारे यांचे ‘छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे मूर्तीमंत जीवनविद्या’ विषयावर व्याख्यान
१९ फेब्रुवारी : शिवशाहीर डॉ. विजय महाराज तनपुरे यांचा ‘यशाचा नवा मंत्र - शिवतंत्र’ हा शाहिरी कार्यक्रम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.