पिंपरीत कामगार आंदोलन
पिंपरी, ता. १२ : राष्ट्रीय मजदूर कॉंग्रेसच्या (इंटक) वतीने निगडीतील अपर तहसील कार्यालयासमोर कामगार, कर्मचारी व सर्वसामान्य जनतेच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन केले. ‘उठ कामगार जागा हो, कामगार चळवळीचा धागा हो’ अशा घोषणा कामगारांनी दिल्या.
आंदोलनात विविध कामगार संघटना, कर्मचारी संघटना, आशा, अंगणवाडी, एमडीएम कर्मचारी, एनएचएम कर्मचारी तसेच इतर क्षेत्रातील कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाले. आंदोलनादरम्यान निदर्शने, घोषणाबाजी व सभेच्या माध्यमातून शासनाचे लक्ष वेधण्यात आले. त्यानंतर अपर तहसीलदार यांना निवेदन सादर करून कामगारांच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्यात आल्या. आंदोलनात मनोहर गडेकर, शीतल कोतवाल, मयूर दाभाडे, गिरीश मेंगे, राजेंद्र खराडे, नुरुद्दीन इनामदार, विजय जाधव, गायत्री सोनार, शशिकांत धुमाळ, सुनील देसाई, यशवंत सुपेकर, शांताराम कदम, भारती घाग, सुनीता जाधव, सुवर्णा कदम, बबिता ससाणे, संतोष हरळ, राजेंद्र खराडे, कुमार मारणे, हमीद इनामदार, विश्वास काशिद, श्रद्धा कचरे कोद्रे, संतोष खेडेकर, गोरख जगताप, विकास साखरे, संतोष पवार, नवनाथ नाईकनवरे, किरण भुजबळ, किशोर पाटील, राजेश पातोंड, विठ्ठल गुंडाळ, विजय मोकळे, सोपान बारबद्दे सहभागी झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

