घोरावडेश्वर डोंगरावरील आगीत मोठे नुकसान
सोमाटणे, ता. १२ : अज्ञात व्यक्तींनी लावलेल्या आगीमुळे घोरावडेश्वर डोंगरावरील गवत व छोट्या वनस्पती मोठ्या प्रमाणात जळून खाक झाल्या. बुधवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास हा प्रकार घडला. वाऱ्याचा वेग अधिक असल्याने आग पायथ्यापासून डोंगराच्यामध्यापर्यंत वेगाने पसरली. यात डोंगरावरील गवत जळून खाक झाले असून लहान झाडे व नव्याने लावलेल्या वनस्पतीही आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या.
घोरावडेश्वर व चौराई डोंगर परिसरात मोठ्या संख्येने मोर, विविध पक्षी, सरपटणारे प्राणी, भेकर, ससे, रानडुकरांसह वन्यजीवांचे वास्तव्य आहे. आगीमुळे या वन्यजीवांवर स्थलांतर करण्याची वेळ आली. डोंगराच्या मध्यभागी असलेल्या विविध औषधी वनस्पतींचेही मोठे नुकसान झाले आहे. घोरावडेश्वर डोंगर हरित करण्यासाठी घोरावडेश्वर विकास प्रतिष्ठान व अभिनेते जॉकी श्रॉफ यांच्या जेके फाउंडेशनच्या वतीने गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात आले होते. उन्हाळ्यात या वृक्षांना टँकरद्वारे पाणी देण्याचे नियोजनही करण्यात आले होते; मात्र उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच लागलेल्या आगीमुळे या वृक्षांचे मोठे नुकसान झाले.
वनसंपत्तीच्या संरक्षणासाठी नागरिकांनी सहकार्य करावे. आग किंवा वनवा लागल्यास तो तातडीने नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करून वनविभागाशी संपर्क साधावा. आग लावणाऱ्याची माहिती मिळाल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.
- प्रकाश शिंदे, वनपरिक्षेत्र अधिकारी, मावळ
PNE26V95077
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

