चिंचवडमध्ये नाना पाटेकर, मधू कांबीकर यांच्या स्मृतींना उजाळा

चिंचवडमध्ये नाना पाटेकर, मधू कांबीकर यांच्या स्मृतींना उजाळा
Published on: 

पिंपरी, ता. १७ : पिंपरी-चिंचवड शहर कलाप्रेमी मंचातर्फे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर आणि अभिनेत्री मधू कांबीकर यांना चिंचवडमधील सायन्स पार्कच्या तारांगण सभागृहात श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कलाकार, साहित्यिक, पत्रकारांनी आठवणींना उजाळा दिला.
अध्यक्षस्थानी पद्मश्री गिरीश प्रभुणे होते. ‘‘कोल्हाटी समाजातील मुलींनी शिक्षणाच्या प्रवाहात यावे, यासाठी उभारण्यात येणाऱ्या वसतिगृहाला मधू कांबीकर यांनी २५ हजार रुपयांची मदत केली. त्यामुळे सामाजिक समरसतेचा प्रवास पुढे नेता आला,’’ अशी आठवण त्यांनी सांगितली.

भाऊसाहेब भोईर यांनी कलाकारांचा कलेचा वारसा कायम जिवंत राहतो, अशी भावना व्यक्त केली. वसंत अवसरीकर यांनी कांबीकर यांच्यासोबतच्या नाटक, चित्रपटांतील अनुभवांना उजाळा दिला. नंदकुमार सातुर्डेकर यांनी पाटेकर यांच्या साधेपणाचे अनुभव, तर दादाराव आढाव यांनी कांबीकर यांच्या शालेय आठवणी सांगितल्या. अश्विनी सातव यांनी माणुसकी जपण्याचे आवाहन केले.

प्रभाकर ओव्हाळ, नरेंद्र बनसोडे, मारुती भापकर, निहाल पानसरे, राजन लाखे उपस्थित होते. विजय जगताप यांनी प्रास्ताविक, गोविंद वाकडे यांनी सूत्रसंचालन केले. अविनाश कांबीकर यांनी समारोप केला. संयोजनासाठी अनिल माने, प्रवीण तुपे, अनिस पठाण, विष्णू मांजरे, गणेश दिघे व नितीन भोगले यांनी पुढाकार घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com