पोलिस मुख्यालयाला ताथवडेत २० हेक्टर जागा

पोलिस मुख्यालयाला ताथवडेत २० हेक्टर जागा
Published on

पिंपरी, ता. २३ : पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे मुख्यालय, कवायत मैदान आणि इतर कार्यालयांच्या उभारणीसाठी ताथवडे येथील पशुसंवर्धन विभागाची २० हेक्टर जमीन हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावास महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मान्यता दिली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अंतिम मान्यतेनंतर शासन निर्णय घेण्यात येणार आहे.
पिंपरी चिंचवडसाठी १५ ऑगस्ट २०१८ रोजी स्वतंत्र पोलिस आयुक्तालय अस्तित्वात आल्यानंतर आयुक्तालय व मुख्यालयासाठी प्रशस्त जागेची आवश्यकता होती. आयुक्तालयासाठी चिखली येथे जागा मिळाली असून भव्य इमारत उभारणीचे कामही सुरू आहे. मात्र, मुख्यालयाच्या जागेचा प्रश्न कायम होता. सध्या निगडी येथे महापालिका शाळेत मुख्यालय सुरू आहे. मुख्यालयासाठी ताथवडे येथील जागेबाबत गृह विभागाने सादर केलेल्या प्रस्तावास १० ऑक्टोबर २०२४ रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत तत्वतः मान्यता देण्यात आली. त्यानुसार ताथवडे येथील वळूमाता प्रक्षेत्र येथे ६७ हेक्टर ९४ आर क्षेत्रापैकी २० हेक्टर जमीन पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयाचे मुख्यालय, कवायत मैदान व इतर संबंधित कार्यालयांसाठी हस्तांतरित करण्याचा निर्णय घेतला होता.
मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर या जमीन हस्तांतरणाची कार्यवाही करण्यासाठी महसूल विभागाकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यानुसार या प्रस्तावावर पुढील कार्यवाही करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Why is MIDC expanding in Kolhapur?
SONU NIGAM
Solapur IT park: सोलापुरात आयटी पार्क उभारणीला गती; २० हेक्टर जागा एमआयडीसीकडे हस्तांतरित होणार, रोजगार क्रांतीची तयारी..
solapur
Marathi News Esakal
www.esakal.com