पावसाळी पर्यटनावेळी वाहने सुरक्षित चालवा

पावसाळी पर्यटनावेळी वाहने सुरक्षित चालवा
Published on

पिंपरी, ता. २४ : पावसामध्ये रस्ते ओले व निसरडे होणे, खड्डे पडणे, दृश्यमानता कमी यामुळे अपघात घडण्यास रस्ते कारणीभूत ठरतात. त्यामुळे पावसाळ्यात वाहन चालवताना खबरदारी घ्यावी, असे आवाहन पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाने वाहन चालकांना केले आहे.
सध्या पावसाळा सुरू झाला आहे. या काळात पर्यटकांची पावले निसर्गरम्य ठिकाणांकडे वळतात. हिरव्या टेकड्या आणि असंख्य धबधब्यांनी वेढलेली विविध ठिकाणे पर्यटकांना आकर्षित करतात. पर्यटनाला जायचे तर मग स्वतःचे वाहन आलेच. मग, कोणी दुचाकीवर फिरत चिंब होतात, तर कोणी कारमधूनच निसर्गाच्या हिरवाईचा आस्वाद घेत पर्यटनाचा आनंद घेतात. पण, काळजी घेतली नाही, तर धोकादेखील वाढतो. पावसात चारचाकी वाहनांपेक्षा दुचाकींच्या अपघातांचे प्रमाण अधिक असते. पावसात वाहन घेऊन बाहेर पडताना विंडशील्ड वायपर्स, हेडलाइट, टेललाइट्स, ब्रेक्स यांची तपासणी करा. पावसाळ्यात वाहन नेहमी हळू चालवावे. नदी पुलावरून पाणी वाहत असेल तर वाहने घेऊन जाऊ नका. पावसाळ्यात दृश्यमानता कमी असल्यामुळे हेडलाइट्स सुरू ठेवावेत. त्यामुळे अपघात टाळता येतील, असे आवाहन परिवहन विभागाने केले आहे.

पावसात अपघात टाळण्यासाठी सूचना
- हवामान आणि सुरक्षिततेची माहिती आधी तपासून घ्या
- शक्य असल्यास पावसाळ्यात वाहन चालविणे टाळा
- वाहनांची नियमित देखभाल दुरुस्ती करा
- बाहेर पडताना वाहन दोन वेळा तपासा
- चाकांकडे विशेष लक्ष देणे आवश्यक
- पावसात हेडलाइट्स आणि इंडिकेटर्स सुरू ठेवा
- दुचाकी चालवताना हेल्मेटचा वापर करा
- डोंगर माथ्यावर वाहन थांबविणे टाळा
- साचलेल्या आणि वाहत्या पाण्यात गाडी नेणे टाळा
- वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा
- गाडीत जॅक, पाना आणि पंक्चर काढण्याचे साहित्य किंवा रिपेअर जेल असू द्या


पावसाळ्यात दृश्यमानता कमी आणि रस्ते निसरडे झाल्यामुळे अपघात होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे वाहन चालकांनी विशेषतः दुचाकी वाहन चालकांनी विशेष खबरदारी घेणे गरजेचे आहे. वाहतूक नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
- राहुल जाधव, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com