जादा परताव्याच्या नावाखाली ३५ लाखांची फसवणूक

जादा परताव्याच्या नावाखाली 
३५ लाखांची फसवणूक
Published on

पिंपरी : शेअर बाजारातील गुंतवणुकीवर जादा परताव्याचे आमिष दाखवून एकाची ३५ लाख सहा हजारांची फसवणूक केल्याची घटना हिंजवडी फेज एक येथे घडली.  या प्रकरणी हिंजवडीतील ३९ वर्षीय व्यक्तीने हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी फिर्यादीला शेअर बाजारात चांगला नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. सुरुवातीला त्यांच्या डिमॅट खात्याचा वापर करून इंट्राडे ट्रेडिंगद्वारे विश्वास संपादन करून त्यांच्याकडून पैसे घेतले. त्यानंतर फिर्यादीकडून पॅनकार्ड आणि आधार कार्डची माहिती घेत बनावट खाते उघडून वेगवेगळ्या खात्यांवर २० लाख ३१० रुपये भरून घेतले. दरम्यान, एका आरोपीने आपण स्टॉक ब्रोकिंग कंपनी चालवत असल्याचे सांगून पाच लाख गुंतवल्यास दिवसाला २५ हजार नफा देण्याचे आमिष दाखवले. असे एकूण ३५ लाख ६ हजार ५३९ रुपये घेऊन फिर्यादीची फसवणूक करण्यात आली.

काळ्या म्हटल्याने एकावर कोयत्याने वार
पिंपरी : मस्करीत ‘काळ्या’ असा आवाज दिल्याच्या रागातून एकाने तरुणावर कोयत्याने वार करून त्याला गंभीर जखमी केले. ही घटना चिखली येथील जाधववाडी परिसरात घडली.  या प्रकरणी बबरुवान सुभाष सूर्यवंशी (रा. जाधववाडी, चिखली) यांनी चिखली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी मंगेश ज्ञानेश्वर मांडगे (रा. जाधववाडी) याला अटक केली आहे. फिर्यादी यांचा खाद्यपदार्थ विक्रीचा गाडा असून आरोपी हा त्यांचा नियमित ग्राहक आहे. फिर्यादीने त्याला मस्करीत ‘काळ्या’ अशी हाक मारली. याचा राग आल्याने आरोपीने कोयत्याने फिर्यादीवर वार केला.

रस्ता दुभाजकाला धडकून महिला दुचाकीस्वाराचा मृत्यू
पिंपरी : रस्ता दुभाजकाला दुचाकी धडकून झालेल्या अपघातात शारदा नागनाथ तुपसांगवे (वय २९, रा. यशोदीप चौक, कर्वेनगर, पुणे) या दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना बावधन येथील चांदणी चौकात घडली. शारदा या त्यांच्या दुचाकीवरून कर्वेनगरकडे जात असताना चांदणी चौकात त्यांची दुचाकी रस्ता दुभाजकाला धडकली. यात गंभीर झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.

बनावट कागदपत्रांच्या आधारे महिलेची फसवणूक
पिंपरी : एका मिळकतीमध्ये महिला भागीदार असल्याचे माहीत असतानाही बनावट कागदपत्रे तयार करून एका महिलेची आर्थिक फसवणूक केली. हा प्रकार पिंपरीतील सत्यम अपार्टमेंट येथे घडली. याप्रकरणी एका महिलेने पिंपरी पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार अरविंद पंडित खरात (रा. कामगार नगर, पिंपरी) आणि एका महिलेवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी या एका मिळकतीमध्ये भागीदार असल्याचे माहीत असतानाही या मिळकतीचा अपहार करण्याच्या उद्देशाने आरोपींनी बनावट दस्तऐवज तयार केले. त्याआधारे बेकायदारित्या महिला आरोपीने ही मिळकत आरोपी अरविंद खरात याच्या नावावर करून फिर्यादीची आर्थिक फसवणूक केली.
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com