

पिंपरी, ता. १० : नागरिकांना कर्जाचे आमिष दाखवून त्यांची बँक खाती ‘म्यूल अकाउंट’ म्हणून वापरणाऱ्या गोवा व कोलकाता येथील दोघांना पिंपरी चिंचवड सायबर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून ७० बँक खात्यांद्वारे कोट्यवधींचे व्यवहार झाल्याचे उघड झाले आहे.
अभिकेष मोहन आचरेकर (रा. गोवा) आणि अनमोल शर्मा (रा. कोलकाता, पश्चिम बंगाल) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. एका खासगी कंपनीतील व्यवस्थापकाला गुंतवणुकीत ५०० टक्के नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची ८३ लाख ८० हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.
तपासादरम्यान फिर्यादीचे ३० लाख रुपये सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या ‘शिवशक्ती एंटरप्रायजेस’ या खात्यात जमा झाल्याचे आढळले. हे खाते अभिकेष आचरेकर आणि प्रतीक्षा नाईक यांच्या भागीदारीतील असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आचरेकर याला खेड शिवापूर येथून ताब्यात घेतले. त्याने अनमोल शर्मा याच्या मदतीने रक्कम स्वीकारल्याची कबुली दिली. त्याला कोलकाता येथून अटक करण्यात आली.
कर्जाचे आमिष दाखवून फसवणूक
आचरेकर हा गोव्यातील सामान्य नागरिकांना कर्ज मिळवून देण्याच्या बहाण्याने त्यांची बँक खाती मिळवत असे. ही सुमारे ७० खाती अनमोल व साथीदारांमार्फत सायबर फसवणुकीचे पैसे स्वीकारण्यासाठी वापरली जात होती. यातील काही संशयित पुणे आणि राजस्थानमधील गुन्ह्यांतही फरार आहेत.
‘म्यूल’ खाते म्हणजे काय?
सायबर गुन्हेगार फसवणुकीची रक्कम स्वीकारण्यासाठी, दुसऱ्या खात्यात वळवण्यासाठी किंवा रोख काढण्यासाठी ज्या खात्यांचा वापर करतात, त्यांना ‘म्यूल’ खाते म्हणतात. अनेकदा खातेदारांना कमिशनचे आमिष दाखवून किंवा त्यांची फसवणूक करून ही खाती वापरली जातात.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.