काळीकाच, फॅन्सी नंबरप्लेट वाहनांना दणका

काळीकाच, फॅन्सी नंबरप्लेट वाहनांना दणका
Published on

सकाळ वृत्तसेवा
पिंपरी, ता. १६ ः पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन विभागाने (आरटीओ) काळी काच, फॅन्सी नंबर प्लेट व हाय सिक्युरटी नंबर प्लेट न लावणाऱ्या वाहनांवर कारवाई सुरू केली आहे. गेल्या १५ दिवसांमध्ये तब्बल ३९५ वाहनांवर कारवाई केली असून त्यांच्याकडून सुमारे आठ लाख नऊ हजार २७० रुपयांचा दंड वसूल केला आहे.
कॅमेराद्वारे होणाऱ्या दंडात्मक कारवाई पासून सुटका करण्यासाठी एमएच १४ एलएन ४८८८ या वाहन मालकाने वाहनाच्या नंबर प्लेटवर इलेक्ट्रीक ऑपरेटेड फ्लॅप बसवला होता. हे वाहन मुंबई-पुणे ‘एक्स्प्रेस-वे’वरुन जात असताना नंबरप्लेट अचानक झाकत असल्याचा व्हिडोओ सोशल मिडीयवर प्रचंड व्हायरल झाला होता. त्यानंतर आरटीओ प्रशासन खडबडून जागे झाले असून काळी काच, फॅन्सी नंबर प्लेट व हाय सिक्युरटी नंबर प्लेट न लावणाऱ्या वाहनांवर कारवाई सुरू केली आहे. वायूवेग पथकांमार्फत ही कारवाई केली जात आहेत. गेल्या १५ दिवसांमध्ये हाय सिक्युरीटी नंबर प्लेट (एचएसआरपी) न लावेल्या २७५ आणि फॅन्सी नंबरप्लेट असलेल्या ५९ वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱ्या आणि हाय सिक्युरिटी नंबर प्लेट नसतील, तर आरटीओकडून अशा गाड्यांच्या मालकांकडून एक हजार रुपये दंड वसूल केला जात आहे. अशा १३८ वाहन चालकांकडून सुमारे एक लाख २८ हजार ५०० रुपये दंड वसूल केला आहे. खासगी ट्रॅव्हल्सवरही कारवाईचा बडगा उगारला असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या ४५ ट्रॅव्हल्सवर कारवाई करण्यात आली आहे.

---

वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई केली जात आहे. आरटीओकडून ही कारवाई तीव्र केली जाणार आहे.
- अश्‍विनी स्वामी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, पिंपरी चिंचवड
-----------------
कारवाईचा तपशील
उल्लंघन ः वाहने ः दंड भरलेली वाहने ः रक्कम
काळी काच ः १६ ः ६ ः ३,०००
एचएसआरपी नंबरप्लेट ः २७५ ः १०६ ः १,०८,०००
फॅन्सी नंबर प्लेट ः ५९ ः ३२ ः २०,५००
खासगी बस ः ४५ ः २३ ः ६,७७,७७०
एकूण ः ३९५ ः १६७ ः ८,०९,२७०
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com