

गणेश उत्सव - तरुण कार्यकर्ता
- सुकन्या दातीरपाटील (वय २५)
-पद - कार्यकर्ती
-त्रिमूर्ती मित्र मंडळ, रामनगर
त्रिमूर्ती मित्र मंडळाचे ५२ व्या वर्षात पदार्पण; सामाजिक सलोखा आणि जनसेवेची परंपरा कायम
रामनगर परिसरातील एक आदर्श आणि सामाजिक सलोखा जपणारे मंडळ म्हणून नावलौकिक मिळवलेले त्रिमूर्ती मित्र मंडळ यावर्षी आपल्या ५२ व्या वर्षात पदार्पण करत आहे. मंडळाने नेहमीच उत्सवाच्या पलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकी जपली असून, शहराच्या सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रात आपले एक वेगळे स्थान निर्माण केले आहे.अडचणीच्या काळात मदतीचा हातकोविडच्या अत्यंत कठीण काळात मंडळाने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. या काळात शाहूनगर, मोहननगर आणि चिंचवड स्टेशन परिसरातील अनेक गरजू कुटुंबांना अन्नधान्य आणि जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करून मंडळाने मोठा आधार दिला.
आरोग्य आणि सामाजिक कार्य
केवळ उत्सवापुरते मर्यादित न राहता, परिसरातील झोपडपट्टी भागातील नागरिकांना वायसीएम रुग्णालयाच्या माध्यमातून आवश्यक ती वैद्यकीय मदत मिळवून देण्यासाठी अध्यक्ष दिलीप दगडूशेठ दातीर पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंडळ सातत्याने प्रयत्नशील असते.
देखावे आणि सांस्कृतिक उपक्रम
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या धर्तीवर विविध सामाजिक विषयांवर आधारित जिवंत व प्रबोधनात्मक देखावे सादर करण्याची परंपरा मंडळाने आजही जपली आहे. या देखाव्यांसाठी मंडळाला अनेकदा उल्लेखनीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. याशिवाय, शहरात प्रथमच महिला गणेशकथाकार रुक्मिणीताई यांच्या ''श्री गणेश कथे''चे यशस्वी आयोजन करण्याचा मानही याच मंडळाला मिळाला आहे.
अनोखी परंपरा
गणेश विसर्जन मिरवणुकीत सर्वात शेवटी निघण्याची त्रिमूर्ती मित्र मंडळाची जुनी आणि शिस्तबद्ध परंपरा असून ती आजही कायम आहे. मंडळाची कार्यकर्ती सुकन्या दातीर पाटील यांनी सांगितले की, मंडळाने गेल्या ५१ वर्षांत कमावलेला हा सामाजिक कार्याचा वारसा पुढे घेऊन जाण्याची आणि तो अधिक सक्षम करण्याची जबाबदारी आता आजच्या तरुण पिढीची आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.