बौर विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बबन मोहोळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बौर विविध कार्यकारी सोसायटीच्या
अध्यक्षपदी बबन मोहोळ
बौर विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बबन मोहोळ

बौर विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बबन मोहोळ

sakal_logo
By

पवनानगर ता. ३१ : बौर विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी बबन बहिरू मोहोळ यांची तर उपाअध्यक्षपदी बबन गायकवाड यांची बिनविरोध निवड झाली. मावळते अध्यक्ष कैलास वाळुंज व उपाअध्यक्ष विठ्ठल ठोंबरे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी सहाय्यक निबंधक कार्यालयात निवडणूक घेण्यात आली. निखारे यांनी अधिकारी म्हणून काम पाहिले. यावेळी ॲड. नामदेव दाभाडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मारुती वाळुंज, विलास मालपोटे, माजी उपसरपंच बाळासाहेब मोहोळ, दत्ता कुडे, सरपंच प्रवीण भवार, माजी अध्यक्ष भरत दाभाडे, गणेश वाळुंजकर, माजी अध्यक्ष बबन ठोंबरे, अंकुश खिरीड, शंकर शिंदे, पवन मावळ सोशल मीडिया अध्यक्ष नितीन कंक, विजय ठोंबरे, भरत गायकवाड, लहू म्हस्के, नंदू म्हस्के, सुभाष म्हस्के व संचालक कैलास वाळुंज, विठ्ठल ठोंबरे, शांताराम वायभट, आदिनाथ दळवी, अंकुश कडू, संतोष दाभाडे, विजय भवार इंदूबाई कंक, जनाबाई शिंदे उपस्थित होते.