पवन मावळात भातलावणीला वेग शेतकऱ्यांचे चारसूत्री लागवडीस प्राधान्य, रोपे जोमात
पवनानगर, ता. २७ : मावळ तालुका हा भात पिकांसाठी प्रसिद्ध आहे. मावळात आंबेमोहर, साळ, दोडकी, कोळम, इंद्रायणी या पारंपरिक भातबियाणांसह कोकणी, पार्वती, फुलेसमृद्धी, बासमती, रूपाली, रत्ना, साईराम, सोनम, सुरूची, वैष्णवी व तृप्ती या संकरित विकसित भातबियाणांच्या वाणालाही मावळात उत्तम प्रतिसाद आहे. मावळातील पश्चिम खोऱ्यातील डोंगरी भागात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने या ठिकाणी आंबेमोहोर, साळ, कोळम आणि इंद्रायणी भातांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.
मावळ तालुक्यात पारंपारिक ,चारसुत्री, पट्टा पद्धत, एस. आर. टी व इतर पद्धतीने भात लागवड केली जाते. मावळात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने ज्या शेतकऱ्यांनी लवकर पेरणी केली होती. त्या शेतकऱ्यांची भात लावणीला सुरुवात झाली आहे. ती भात रोपे लावणी योग्य झाल्याने तसेच पाऊस चांगला झाल्याने भातखाचरात मुबलक पाणी झाल्याने शेतकऱ्यांनी आता भात लावणीला सुरुवात केली आहे. तर काही शेतकरी आपल्या भात रोपांना खते मारण्याच्या तयारीत आहे.
पवन मावळात भात लावणीच्या कामाला जोरदार सुरुवात झाली आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी चारसुत्री पद्धतीने भात लागवडीस प्राधान्य दिले आहे. पेरणी काळात झालेल्या पावसामुळे जमिनीला वाफसा येण्याची वाट न पाहता शेतकऱ्यांनी चिखलावरच पेरणी केली होती. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे भाताची रोपे यावर्षी जोमात येतील की नाही, याची खात्री नव्हती. परंतु काही भागात भात रोपांचे नुकसान झाले असले तरी काही ठिकाणी रोपे जोमात आलेली आहेत. यामुळे काही प्रमाणात शेतकरी सुखावला असून, भात लावणीला सुरवात केली आहे. पवन मावळ भागातील महागाव पट्ट्यातील लागवडीस आज सुरवात झाली.
दुबार पेरणीचे संकट
अवकाळी पावसाने भात पेरणीच्या कामाला उशीर झाला. त्यातच हातचा हंगाम जाऊ नये म्हणून शेतकऱ्यांनी चिखलावरच पेरणी केली. यामुळे काही ठिकाणी रोपे दबली गेली तर काही ठिकाणी रोपे उगवलीच नाहीत. काही ठिकाणी रोपे लहान असताना झालेला जोरदार पाऊस यामुळे रोपे कुजली गेली आहेत. त्यामुळे पुन्हा पेरणीचे संकट शेतकऱ्यांवर आले आहे.
चारसुत्री लागवडीवर भर
ऐन पेरणीच्या काळाअगोदर झालेल्या पावसामुळे बहुतेक ठिकाणी भात रोपे वाया गेली आहेत. त्यामुळे बहुतेक ठिकाणी चारसूत्री पद्धतीने भात लागवडीवर भर दिला जात आहे. या आधुनिक पद्धतीने भात रोपे कमी लागतात त्याचप्रमाणे उत्पादन वाढीसाठी ही पद्धत जास्त उपयोगी ठरत आहे. एकंदरीत कमी खर्चात जास्त उत्पादन मिळत असल्याने बहुतांश शेतकरी या पद्धतीकडे वळत आहेत.
फोटो ः 02219
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.