येळसेतील स्मारकापाशी आज श्रद्धांजली सभा

येळसेतील स्मारकापाशी आज श्रद्धांजली सभा

Published on

पवनानगर, ता. ८ ः पवना बंदिस्त जलवाहिनीच्या विरोधातील आंदोलनात तीन शेतकरी मृत्यूमुखी पडल्याच्या दुर्घटनेला उद्या (ता. ९) १४ वर्षे पूर्ण होता आहेत. यानिमित्त येळसे येथील स्मारकावर श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात आली आहे. या कालावधीत राज्यात दोन वेळा सत्तांतर होऊन सर्वच पक्षांच्या नेत्यांना खुर्च्या मिळाल्या. यानंतरही प्रकल्प बंद झालेला नाही. दुसरीकडे सुमारे दोनशे जखमी आंदोलक किंवा त्यांच्या वारसांना नोकऱ्या मिळालेल्या नाहीत.
पवना बंदिस्त जलवाहिनी विरोधी कृती समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर दळवी यांनी भाजप, शिवसेना, भारतीय किसान संघ व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशा सर्वच पक्षांना सहभागाचे आवाहन केले आहे. बऊर येथून महामार्गावरून येळसे येथील स्मारकापर्यंत ज्योत आणली जाईल. दुपारी १२ वाजून ४० मिनिटांनी श्रद्धांजली वाहण्यात येईल.
या प्रकल्पाच्या विरोधात २०११ मध्ये आंदोलन झाले होते. आंदोलकांवर गोळीबार झाला होता. त्यात तीन शेतकरी मृत्यूमुखी पडले होते. महानगरपालिकेने विश्वासात न घेता प्रकल्प राबविल्याचा भूमीपुत्रांचा आरोप होता. तेव्हा भारतीय जनता पक्ष, शिवसेना व भारतीय किसान संघ या पक्षांचाही आंदोलनात सहभाग होता. आंदोलनाला हिंसक वळण लागल्यामुळे दोनशेपेक्षा जास्त शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. हे गुन्हेही अद्याप मागे घेण्यात आलेले नाहीत.
आतापर्यंत मावळ तालुक्यात भाजपची सत्ता होती. २०१४ ते २०१९ पर्यंत भाजप-शिवसेना सत्तेवर असूनही प्रकल्पाला विरोध होता. २०१९ मध्ये मावळ तालुक्यात राष्ट्रवादीचे सुनील शेळके आमदार म्हणून निवडून आले. राज्यात महाविकास आघाडीचे सरकारची सत्ता आली. आमदार शेळके हे उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांचे कट्टर समर्थक मानले जातात. त्यामुळे प्रकल्पाचा मार्ग सुकर होण्याची चिन्हे होती, मात्र पाच वर्षांत परिस्थिती जैसे थी राहिली. त्यानंतर अजित पवार यांनी महाविकास आघाडीची साथ सोडून महायुतीचा सत्तेचा मार्ग सुकर केला. गेल्या वर्षी विधानसभा निवडणुकीत भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी या पक्षांनी मुसंडी मारली.
---
भाजपची भूमिका महत्त्वाची
मावळ तालुक्यात महायुती, भाजप व राष्ट्रवादी यांचे सूर जुळलेले नाहीत. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ते जुळतील की नाही हे अद्याप स्पष्ट नाही. त्यामुळे बंदिस्त जलवाहिनीला भाजप किती विरोध करते यावरच निर्णय अवलंबून आहे. आत्तापर्यंत भारतीय किसान संघ, आरपीआय, शिवसेना हे भाजपच्या साथीत आंदोलनात सहभागी झाले होते. काल निषेध सभेत मात्र तालुका शिवसेनेने प्रकल्प बंद होईपर्यंत विरोध कायम राहील असा इशारा दिला आहे. यावरून प्रकल्प रद्द होणार का मार्गी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com