पिंपरी-चिंचवड
रावेतमध्ये रक्तदान शिबिर
रावेत, ता. १२ : रोटरी क्लब ऑफ प्राधिकरण, पुणे यांच्यावतीने रावेत येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन एलसीसीआयए पीसीएमसी चॅप्टर आणि श्री शिवछत्रपती मित्र मंडळ (रावेत) यांच्या सहकार्याने करण्यात आले. परिसरातील नागरिक, युवक तसेच मंडळाचे कार्यकर्त्यांनी रक्तदान करून समाज सेवेचा आदर्श घालून दिला.
रक्तदात्यांच्या आरोग्य तपासणीसाठी आयोजकांनी अनेक मोफत सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यात रँडम ब्लड शुगर तपासणी, सीबीसी तपासणी, प्राथमिक तपासणी, तज्ञ डॉक्टरांकडून वैद्यकीय सल्लामसलत तसेच मोफत सीपीआर प्रशिक्षणाचा समावेश होता.