उघड्या चेंबरमुळे अपघाताचा शक्यता

उघड्या चेंबरमुळे अपघाताचा शक्यता

Published on

आकुर्डी, ता. २० : रावेत, आकुर्डी आणि प्राधिकरण परिसरात रस्त्याचे तसेच सांडपाणी वाहिन्यांचे काम सुरू आहे. प्राधिकरणातील सिंधुनगर भागात सुरू असलेल्या सांडपाणी वाहिनी बदलण्याच्या कामामुळे रस्त्यांवर चेंबर उघडे सोडण्यात आले आहेत. वाहनचालकांना आणि पादचाऱ्यांना उघड्या चेंबरची कल्पना न आल्यास ऐन सणासुदीच्या दिवसात उघड्या चेंबरमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
अर्धवट कामामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे, त्यामुळे डासांचे प्रमाण वाढण्याची भीती आहे. नागरिकांनी प्रशासनाकडे काम तत्काळ पूर्ण करण्याची मागणी केली आहे. पालिकेच्या ‘अ’ प्रभागाचे ड्रेनेज विभागाचे कार्यकारी अभियंता राजेंद्र जावळे यांच्याशी याबाबत संपर्क केली असता संपर्क झाला नाही.

या रस्त्यावर प्रकाशाची पुरेशी व्यवस्था नसल्याने उघड्या चेंबरमुळे अपघात होण्याचा धोका अधिक आहे. प्रशासनाने या ठिकाणी झाकणे बसवावी.
-अनिल पाटील, नागरिक

शाळेच्या परिसरात ही कामे सुरू असल्याने लहान मुलांना धोका आहे. काम पूर्ण होईपर्यंत खबरदारी घेणे गरजेचे आहे.
-स्वाती देशमुख

Marathi News Esakal
www.esakal.com