गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त महोत्सवाचे आयोजन

गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त महोत्सवाचे आयोजन

Published on

रावेत, ता. २ : निगडीतील श्री गजानन महाराज मंदिर, श्री गजानन महाराज उद्यान येथे प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही श्री गजानन महाराजांचा प्रकट दिन साजरा करण्यात येणार आहे. रविवारी (ता. ८) होणाऱ्या या सोहळ्यानिमित्त शनिवारी (ता. ७) ते रविवारी महाशिवरात्र पर्यंत विविध धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या महोत्सवात अभिषेक, आरती, पारायण, भजन, पालखी मिरवणूक, प्रवचन, कीर्तन, नृत्यप्रस्तुती तसेच भावगीत-भक्तिगीतांचे कार्यक्रम रंगणार आहेत. रविवारी पहाटे काकड आरती, महापूजा, महाभिषेक, खंजेरी भजन, श्री गजानन विजय ग्रंथाचे वाचन, महाआरती आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. याच दिवशी सामाजिक उपक्रमांतर्गत भव्य रक्तदान शिबिरही होणार असून विविध सामाजिक संस्था आणि रुग्णालयांचे सहकार्य लाभणार आहे.
संपूर्ण सप्ताहात मुंबई व पुण्यासह विविध भागांतील गायक, भजनी मंडळे, कीर्तनकार आणि कलाकार भक्तांसाठी कार्यक्रम सादर करणार आहेत. अजितकुमार कडकडे यांचे गायन, चैतन्य महाराज वाडेकर यांचे कीर्तन, तसेच विविध महिला भजनी मंडळांचे सादरीकरण हे आकर्षण ठरणार आहे. महाशिवरात्रीनिमित्त महाभिषेक, रुद्राभिषेक आणि कीर्तनाने उत्सवाची सांगता होणार आहे.
श्री गजानन महाराज मंदिर चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सर्व भक्तांनी या कार्यक्रमांचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com