गणित प्रयोगशाळेचे
साळुंब्रे येथे उद्‍घाटन

गणित प्रयोगशाळेचे साळुंब्रे येथे उद्‍घाटन

शिरगाव, ता ३० : साळुंब्रे येथील ग्रामप्रबोधिनी विद्यालयात गणित प्रयोगशाळेचे उद्‍घाटन नुकतेच करण्यात आल्याची माहिती या केंद्राचे संचालक व गणित अध्यापक लक्ष्मीकांत मुंडे यांनी दिली. या प्रयोगशाळा रोटरी क्लब ऑफ पुणे सेंटर यांचे संचालक गिरी सखराणी यांच्या आर्थिक मदतीने आणि रोटरी क्लब ऑफ पुणे सेंटर यांचे अध्यक्ष अजय चिटणीस यांच्या प्रयत्नातून आणि राहुल कोकीळ यांची मदत घेऊन उभा करण्यात आली आहे. या प्रयोगशाळेत सर्व गणितीय संकल्पना स्पष्ट करण्यासाठी गणितीय खेळांची निर्मिती करण्यात आली आहे. खेळातून गणित अशी खेळणी तयार करण्यात आली आहेत. ज्यांच्या मदतीने विद्यार्थी आपल्या गणितीय संकल्पना स्पष्ट करू शकतील, असे जवळपास अडीच लाख रुपयांचे गणिती साहित्य या प्रयोगशाळेत ठेवण्यात आले आहेत. गणिताच्या संकल्पना यांचे कृतीतून शिक्षण झाले तर ते लवकर समजतात म्हणून गणिताच्या संकल्पनांचे अध्ययन उत्तमरीत्या होण्याच्या दृष्टिकोनातून प्रयोगशाळा तयार तयार करावयाची होती. गणितातील अवघड व किचकट संज्ञा व संकल्पना विद्यार्थ्यांना सहज समजल्या तर गणित विषय आकलनास सोपा होईल. गणित विषयाची आवड निर्माण होण्याकरिता गणितीय प्रयोगशाळा याचा नक्कीच चांगला उपयोग होईल. गणित हा विषय सोपा आहे, परंतु जोपर्यंत त्याची आवड लागत नाही, तोपर्यंत तो अवघड वाटतो. परंतु एकदा का गणिताची आवड लागली तर त्याच्यासारखा सोपा दुसरा विषय नाही. म्हणून या प्रयोग शाळेत गणिताचे अत्यंत क्लिष्ट संकल्पना सुद्धा अत्यंत साध्या पद्धतीने आणि खेळातून सोडवल्या आहेत. त्यामुळे ही गणित प्रयोगशाळा पंचक्रोशीमध्ये कुतूहलाचा विषय होत आहे.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे कार्यवाह व्यंकट भताने, मुख्याध्यापक राजेंद्र लासूरकर, गणेश भताने, चंद्रशेखर पंडित, धनंजय राजोपाध्ये, अमित बागाईतकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन छाया मुंढे यांनी केले. आभार लक्ष्मीकांत मुंडे यांनी मानले. ही प्रयोगशाळा उभा राहण्यासाठी गणेश भताने, नथू सुपे, चंद्रकांत ओव्हाळ, मनीषा वहिले आदी शिक्षकांनी सहकार्य केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com