पिंपरी-चिंचवड
काळेवाडीत पर्युषण पर्वाची तयारी
काळेवाडी, ता. १० : येथील जैन मंदिरात यंदाच्या पर्युषण पर्वाची जोरदार तयारी करण्यात येत आहे. त्यासाठी काळेवाडी जैन संघाचे सर्व ट्रस्टी आणि सदस्य या पवित्र पर्वासाठी उत्साहाने सहभागी होऊन एकत्र काम करत आहेत. मंदिर परिसर भक्तांच्या गर्दीने फुलून गेल्याचा दिसून येत आहे.
यावेळी पर्युषण पर्वाच्या आठही दिवस मंदिरात भव्य सजावट केली जाणार असून दररोज सायंकाळी भक्तिपूर्ण भक्ती भावना कार्यक्रम आयोजित होईल. तसेच भगवंतांच्या सुंदर आंगी रचनेचे आयोजन केले जाणार आहे. विशेष म्हणजे, जन्म वाचनाच्या दिवशी पूर्ण दिवस विविध धार्मिक कार्यक्रम आणि स्वामी वात्सल्याचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती संघाचे अध्यक्ष सुभाष कोठारी यांनी यावेळी दिली.