सराफ संघटनेचे उद्‍घाटन

सराफ संघटनेचे उद्‍घाटन

Published on

काळेवाडी, ता.१६ : निगडी प्राधिकरण येथे गोल्ड ॲण्ड सिल्वर सराफ असोसिएशन, पिंपरी चिंचवडची स्थापना व उद्‍घाटन झाले. ही संघटना शहरातील सराफ बांधवांच्या सामूहिक हितासाठी स्थापन करण्यात आली आहे.
उदघाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सुहास बाबर, विटा नगरपरिषदेचे वैभव पाटील, विश्वजीत बारणे, संघटनेचे उपाध्यक्ष प्रवीण देवकर, सुशांत बाबर, नंदकुमार जगताप, मालोजी चव्हाण, नागनाथ मोरे, राजकिरण पाटील आदी उपस्थित होते. सराफ बांधवांच्या हक्काचे रक्षण, व्यवसायातील पारदर्शकता, सुरक्षा, सामाजिक बांधिलकी आणि व्यवसायवृ‌द्धी यासाठी संघटनेकडून प्रयत्न केले जाणार असल्याचे अध्यक्ष तानाजी चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

Marathi News Esakal
www.esakal.com