डिलिव्हरी बॉईजकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन

डिलिव्हरी बॉईजकडून वाहतूक नियमांचे उल्लंघन

Published on

काळेवाडी, ता.२९ : ऑनलाइन ई-कॉमर्स वेबसाईटमुळे डिलिव्हरी बॉयच्या माध्यमातून गरजू तरुणांना रोजगार मिळाला आहे. तसेच ग्राहकांनाही आपल्याला हव्या त्या वस्तू घरपोच मिळत आहेत. मात्र, डिलिव्हरी बॉईजकडून वाहतूक व सुरक्षेचे मूलभूत नियम डावलले जात असल्याचे दिसून येत आहे. डिलिव्हरी बॉय स्वतः बरोबरच अन्य नागरिकांचाही जीव धोक्यात टाकत असल्याचे दिसून येत आहे.
ऑनलाइन व्यवसायामध्ये ई-कॉमर्स कंपन्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये क्रांती केल्यावर ग्राहकांना ऑनलाइन संकेतस्थळांबरोबरच मोबाईल ॲपद्वारे हव्या त्या वस्तू घरपोच मिळू लागल्या. विविध कंपन्या व्यावसायिक पातळीवर स्वतःचा नफा वाढविण्यासाठी तसेच सेवा चांगल्या प्रकारे व तत्काळ देण्यासाठी गरजू तरुणांना डिलिव्हरी बॉय म्हणून रोजगाराची एक मोठी संधी देत आहे. स्वतःचे नोकरी, व्यवसाय करून अनेक तरुण हे काम अर्धवेळ करत आहेत.
नोकरी, व्यवसायासाठी तरुणांना घेत असताना संबंधित कंपन्या विविध नियमावलीची माहिती, नागरिकांशी कसे वागावे यासंदर्भात तांत्रिक व इतर प्रशिक्षण देत असतात. मात्र, त्यांना वाहतूक सुरक्षेबद्दल फारशी माहिती दिली जात नाही. त्याने डिलिव्हरी बॉयकडून वाहतुकीचे व सुरक्षेचे मूलभूत नियम डावलले जात असल्याचे दिसून येत आहे. त्याकडे कंपनीच्या स्थानिक पातळीवरील कार्यालयांचे लक्ष नसल्याचे दिसून येत आहे.

काय आहे समस्या ?
- विविध सेवा पुरविण्यासाठी डिलिव्हरी बॉयकडून दुचाकी व इतर वाहनांचा उपयोग
- संबंधित कंपनीकडून डिलिव्हरी बॉयला गणवेश, पेट्रोल खर्च, दैनिक भत्ता, पदाप्रमाणे पगार व इतर सुविधा
- सुरुवातीला डिलिव्हरी बॉयचे नियमांचे पालन, मात्र नंतर दुर्लक्ष

कोणत्या नियमांची पायमल्ली
- हेल्मेट न घालता दुचाकी चालवणे,
- विरुद्ध बाजूने वाहन चालवणे
- अति वेगवान पद्धतीने दुचाकी चालवणे
- कंपनीने दिलेल्या गणवेशाऐवजी स्वतःचे कपडे घालणे
- स्वच्छता न ठेवणे, हॅन्ड ग्लोज नसणे

अनेक वेळा डिलिव्हरी बॉय हेल्मेट न वापरता वाहने चालविताना दिसतात. डिलिव्हरी वेळेत द्यायची असल्याने हे तरुण अतिशय धोकादायक पद्धतीने वाहने चालवितात. पोलिसांनी त्यांच्यासाठी वेळोवेळी वाहतूक नियमांच्या संदर्भात व सुरक्षा संदर्भात मार्गदर्शनपर शिबिरे घ्यावीत.
- दीपक नाईक, नागरिक

अनेक वेळा हे गरीब तरुण नोकरी व त्यातून मिळणाऱ्या पैशांवर शिक्षण व घर चालविताना दिसून येतात. परंतु त्यांच्याकडून वाहन चालविताना जीव धोक्यात टाकणे, सिग्नल तोडणे, हेल्मेट न वापरणे व वेगाने गाडी चालवणे अशा गोष्टी घडत असतात.
- सुरेखा केने, नागरिक

मी एका खासगी कंपनीला अन्नपदार्थ डिलिव्हरी करण्याचे काम करतो. कंपनीकडून देण्यात येणारे साहित्य हे मोजके व अपूर्ण आहे. त्यात हेल्मेट व इतर व्यवस्था नसते. आम्ही हेल्मेट वापरण्याचा पूर्ण प्रयत्न करतो. परंतु अनेकदा ते वापरणे शक्य होत नाही. दररोजच्या धावपळीत जिवास धोका असतानाही आम्हाला घरची जबाबदारी उचलण्यासाठी काम करावे लागते.
- मुकेश पवार, डिलिव्हरी बॉय, रहाटणी

SVW25A00182

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com