आंदरमावळातील कुसूर गावात तरुणाचा खून

आंदरमावळातील कुसूर गावात तरुणाचा खून

तळेगाव दाभाडे, ता. ६ ः भांडणात भावाच्या नाकावर बुक्की मारल्याचा राग मनात धरून ८ ते ९ जणांच्या टोळक्याने कुसूर - खांडी रस्त्यावरील कामा फार्म येथे धारदार शस्त्राने वार करत तरूणाचा खून केला. बुधवारी रात्री साडेनऊ वाजता हा प्रकार घडला.
अक्षय बाबाजी जगताप (वय २६, वर्षे रा. चंदननगर, पुणे) असे मयत तरूणाचे नाव आहे. याबाबत वडगाव मावळ पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे, कोयता, लोखंडी रॉड, लाकडी दांडके व लोखंडी सळ्या जप्त करण्यात आले आहे.
पोलिस निरीक्षक कुमार कदम म्हणाले,‘‘अंकुश तुरडे आणि मयत तरूण अक्षय जगताप यांच्यामध्ये भांडण झाले. त्यात अक्षय याने अंकुश तुरडे याच्या नाकावर बुक्की मारली. त्याचा राग मनात धरून अंकुश याचा भाऊ अशोक तुरडे याने आपल्या ८ ते ९ साथीदारांना सोबत घेऊन अक्षय याला जबर मारहाण केली. तसेच त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. डोक्यावर, हातापायावर वार केले. त्यामध्ये गंभीर जखमी होऊन अक्षयचा मृत्यू झाला. याबाबत आरोपी अक्षय तुरडेसह त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत. लवकरच आरोपींच्या मुसक्या आवळल्या जातील.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com