तळेगावात रस्त्यांच्या विकासकामांचे भूमिपूजन

तळेगावात रस्त्यांच्या विकासकामांचे भूमिपूजन

तळेगाव दाभाडे, ता. १० ः स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वित्त विभाग २०२३-२४ अंतर्गत तळेगाव दाभाडे शहरातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी सुमारे तीन कोटी सात लाख रुपये निधी मंजूर झाला आहे. त्या विकास कामांचे रविवारी (ता.९) त्यांच्या आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
या भूमिपूजन समारंभाला माजी नगरसेविका कल्पना भोपळे, सुरेश झेंड, सागर पवार, मंगेश सरोदे, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अतिश परदेशी, चंद्रकांत थिटे, संतोष असवले आदी स्थानिक नागरिक उपस्थित होते.
उमंग सोसायटी ते बीएसएनएलपर्यंतचा रस्ता, एमएसईबी ते तत्त्व हॉटेलपर्यंत रस्ता आणि अथर्व हॉस्पिटल ते शेळके गार्डनपर्यंतचा रस्ता डांबरीकरण करणे ही कामे या निधीमधून होणार आहेत. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या रस्त्यांची अत्यंत दुरवस्था झाली होती. त्यामुळे, रस्त्यांच्या दुरुस्तीची नागरिकांकडून सातत्याने मागणी होत होती. अखेर या रस्त्यांच्या कामांना सुरूवात करण्यात आल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले.
शेळके म्हणाले,‘‘विकासात्मक दृष्टिकोनातून शहरातील कामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणला आहे. शहरातील बहुतांश अंतर्गत रस्त्यांचे डांबरीकरण देखील झाले आहे. बॅलाडोर भागातील नागरिकांकडून रस्ता दुरुस्तीची सातत्याने मागणी होत होती. या अनुषंगाने तीन कोटीच्या निधीतून ही कामे मार्गी लागणार आहेत. त्याचे मनस्वी समाधान आहे.
PNE24U25200

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com