वाढीव मिळकतकर रद्द करा, अन्यथा आंदोलन

वाढीव मिळकतकर रद्द करा, अन्यथा आंदोलन

तळेगाव दाभाडे, ता.१० ः शहरातील नागरिकांवर लादलेला वाढीव मिळकतकर रद्द करावा तसेच पाणीपुरवठा सुरळीत ठेवावा, अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शहर भारतीय जनता पक्षाने दिला आहे.
तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या उपमुख्याधिकारी ममता राठोड यांची भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. वाढीव मिळकतकर आणि पाणीपुरवठा सुरळीत होण्याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. तसेच त्यांना तसे लेखी निवेदन देण्यात आले. शहरातील पाणीपुरवठा काही महिन्यांपासून विस्कळीत झाला आहे. त्यामुळे, ऐन पावसाळ्यात पाण्यासाठी महिलांना वणवण फिरण्याची वेळ आली आहे. कोणतीही पूर्वकल्पना न देता नागरिकांवर वाढीव कर लादला गेला असल्याचे निवेदनात म्हटले आहे.
यावेळी भाजपचे शहराध्यक्ष अशोक दाभाडे, माजी नगरसेवक सचिन टकले, शोभा भेगडे, सरचिटणीस स्वप्नील भेगडे, तनुजा दाभाडे, निर्मल ओसवाल, महेंद्र पळसे, विनायक भेगडे, सतीश पारगे, मृदुला भावे, संध्या जाधव, रूपेश गायकवाड, निर्मला पोटे, गौरव गुंड, ओबीसी मोर्चाचे अध्यक्ष नितीन पोटे, अनिल वेदपाठक, सुधाकर घनशेट्टी, आशुतोष हेंद्रे, ऋषिकेश सुतार, समीर भेगडे, रोहन जाधव, विशाल जव्हेरी आदी यावेळी उपस्थित होते. योग्य ती उपाययोजना करून प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्याचे आश्वासन उपमुख्याधिकारी राठोड यांनी यावेळी दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com