प्राथमिक कन्या शाळा भरतेय व्यापारी संकुलात

प्राथमिक कन्या शाळा भरतेय व्यापारी संकुलात

Published on

तळेगाव दाभाडे, ता. ३ ः सरसेनापती उमाबाई दाभाडे प्राथमिक कन्या शाळा क्रमांक चारच्या इमारतीची पडझड झाल्याने ही शाळा व्यापारी संकुलातील गाळ्यांमध्ये भरत आहे. नगर परिषदेच्या डोळेझाकपणामुळे सुमारे १५५ विद्यार्थिनींच्या शिक्षणाची परवड होत आहे. या शाळेची पुनर्बांधणी लवकर करावी, अशी मागणी तळेगाव दाभाडे शहर भारतीय जनता पक्षाने नगर परिषदेकडे केली आहे.
भारतीय जनता पक्षाचे तळेगाव दाभाडे शहराध्यक्ष अशोक दाभाडे, सरचिटणीस शोभा भेगडे, स्वप्नील भेगडे, प्रसिद्धी प्रमुख अमित भागीवंत, उपाध्यक्ष मृदुला भावे, सोशल मीडिया अध्यक्ष ऋषिकेश सुतार, महिला मोर्चा कार्याध्यक्ष वंदना दाभाडे, वनिता वाळमे, माजी सैनिक आघाडी अध्यक्ष गजानन राजहंस, शिक्षक आघाडी अध्यक्ष सोपान आल्हाट आदी यावेळी उपस्थित होते.
पक्षाकडून दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘‘तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या शिक्षण मंडळाची सरसेनापती उमाबाई दाभाडे प्राथमिक कन्या शाळा क्रमांक ४ मधील विद्यार्थिनी जिजामाता चौक येथील कै. केशवराव वाडेकर संकुलामधील दुकानांच्या गाळ्यांमध्ये शिक्षण घेत आहेत. पण, येथे १५५ विद्यार्थिनींची पुरेशा जागे अभावी हाल होत आहेत.
गावभागातील शाळेच्या जुन्या इमारतीमध्ये मद्यपी लोकांमार्फत चालणारे अनुचित व बेकायदेशीर प्रकार त्वरित थांबवावेत. व कन्या शाळेची पुनर्बांधणीबाबत लवकरात लवकर करावी.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.