इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या अध्यक्षपदी रामदास काकडेइंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या अध्यक्षपदी रामदास काकडे
तळेगाव दाभाडे, ता. ३ ः इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेची नवी कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. वार्षिक सर्वसाधारण सभेत संस्थेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ उद्योजक रामदास काकडे व कार्यवाहपदी चंद्रकांत शेटे यांची फेरनिवड करण्यात आली.
कार्यकारिणी पदांमध्ये बदल करण्यात आली असून, उपाध्यक्षपदी ज्येष्ठ उद्योजक संजय साने व शैलेश शहा यांची तर खजिनदारपदी निरूपा कानिटकर यांची निवड करण्यात आली आहे. संस्थेचे नूतन अध्यक्ष रामदास काकडे यांच्या दूरदृष्टीमुळेच संस्थेने गरुडभरारी घेतली असून, त्यांच्या मार्गदर्शनाखाली यशोदा महादेव काकडे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग हे महाविद्यालय सुरू झाले आहे. गेल्या पाच-सहा वर्षांत कृष्णराव भेगडे फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च बी.फार्मसी व डी.फार्मसी महाविद्यालये सुरू केली. आठ एकरमध्ये खेळाचे मैदान आणि १५ एकरांच्या सुशोभित कॅम्पसमधून सुमारे आठ हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. महाविद्यालयही बीएससी कॉम्प्युटर सायन्स, पीएच.डीचे संशोधन केंद्र यासारखे अनेक अभ्यासक्रम नव्याने सुरू झाले आहेत. विद्यार्थ्यांसाठी वसतिगृहाची सुविधा उपलब्ध आहे. कांतिलाल शहा इंग्लिश मीडियम स्कूल, श्री. संत तुकाराम विद्यालय, श्रीराम विद्यालय या शाळांमध्ये देखील नव्याने विस्तारित वर्गखोल्यांची कामे झालेली आहेत. लवकरच इंद्रायणी विद्या मंदिर संस्था इंद्रायणी विद्यापीठाच्या दिशेने वाटचाल करीत आहे.
कार्यकारिणी खालीलप्रमाणे : रामदास महादेव काकडे (अध्यक्ष), चंद्रकांत दामोदर शेटे (कार्यवाह ), संजय विष्णू साने (उपाध्यक्ष), शैलेश कांतिलाल शहा (उपाध्यक्ष), निरुपा सुहास कानिटकर (खजिनदार), संजय विश्वनाथराव भेगडे (सदस्य), गोरखनाथ रघुनाथ काळोखे (सदस्य), दीपक विनोदकुमार शहा (सदस्य), गणेश वसंतराव खांडगे (सदस्य), विलास बबनराव काळोखे (सदस्य) संदीप चंद्रकांत काकडे (सदस्य), युवराज बाळासाहेब काकडे (सदस्य), रणजित रामदास काकडे (सदस्य).
रामदास काकडे,
चंद्रकांत शेटे