पिंपरी-चिंचवड
‘पीसीसीओई’च्या विद्यार्थ्यांची सहारा वृद्धाश्रमास भेट
तळेगाव दाभाडे, ता. ७ : आकुर्डी येथील पीसीसीओई (पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग) येथील विद्यार्थ्यांनी कुसवली येथील सहारा वृद्धाश्रमाला भेट दिली.
या आश्रमात चौदा ज्येष्ठ नागरिकांना आश्रय देण्यात आला आहे. विद्यार्थ्यांनी त्यांच्याशी संवाद साधला. आश्रमातील पिठलं-भाकरीच्या जेवणाचा विद्यार्थ्यांनी आनंद घेतला. या उपक्रमाचे नेतृत्व प्रा. वर्षा बेंद्रे यांनी केले. आश्रमाचे संचालक विजय जगताप यांनी विद्यार्थ्यांचे मनःपूर्वक आभार मानले. भेटीनंतर अनेक विद्यार्थी भावूक झालेले दिसले. ‘समुदाय सहभागिता प्रकल्प’ या उपक्रमांतर्गत या भेटीचे आयोजन करण्यात आले.

