नगरसेविका झाल्यानंतरही
फळविक्रीचा व्यवसाय सुरू

नगरसेविका झाल्यानंतरही फळविक्रीचा व्यवसाय सुरू

Published on

तळेगाव दाभाडे, ता. २४ : लोणावळा नगरपरिषदेच्या निवडणुकीत विजय मिळवून नगरसेविका झाल्यानंतरही भाग्यश्री जगताप यांनी फळविक्रीचा मूळ व्यवसाय सुरू ठेवला आहे. गेल्या २० वर्षांपासून त्या फळविक्री करून संसाराचा गाडा चालवीत आहेत.
निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतरही त्या पुन्हा हातगाडीवर फळविक्री करताना दिसतात. त्यामुळे ग्राहकांसह नागरिकांनाही सुखद धक्का बसला आहे. मतदारांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवीत, आपला मूळ व्यवसाय कधीही सोडणार नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली आहे. मावळ व लोणावळा परिसरात त्यांच्या साधेपणा, कष्ट व लोकशाही मूल्यांची विशेष चर्चा होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या भाग्यश्री जगताप यांना १४६८ मते मिळाली, तर भाजपच्या रचना विजय सिनकर यांना ८६० मते मिळाली. ६०८ मतांनी भाग्यश्री जगताप विजयी झाल्या.

सकाळी पेरू विक्री, संध्याकाळी प्रचार
भाग्यश्री जगताप यांची निवडणूक लढविण्याची कहाणी कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. त्या सकाळी-दुपारी पेरू विक्री करायच्या, तर संध्याकाळी मतदारांच्या गाठीभेटी घेत प्रचार करायच्या. खंडाळा बोरघाट आदिवासी माथ्यावरील बॅटरी हिल परिसरातील आदिवासी पट्ट्यातील त्या रहिवासी आहेत. प्रचारादरम्यान या भागात त्यांचे उत्स्फूर्त स्वागत होत होते.
आमदार सुनील शेळके यांनी भाग्यश्री जगताप यांना उमेदवारी दिली होती. संघर्ष, कष्ट व जिद्दीचा त्यांचा प्रवास आज विजयात रुपांतरीत झाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
---
फोटो
04396

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com