चुरशीच्या लढतीत रेश्मा देवकर विजयी

चुरशीच्या लढतीत रेश्मा देवकर विजयी

Published on

तळेगाव दाभाडे : कार्ला पंचायत समिती गणातील अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार रेश्मा राजू देवकर यांनी विजय मिळवला. भाजपच्या रंजना गायकवाड यांचा त्यांनी सुमारे दीड हजार मतांनी पराभव केला. या निवडणुकीत शेवटपर्यंत चुरस पाहायला मिळाली.
निवडणुकीपूर्वी शिवसेना-ठाकरे पक्षात असलेले प्रसिद्ध गाडामालक सुरेश गायकवाड यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या पत्नी रंजना गायकवाड यांना भाजपने उमेदवारी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसने रेश्मा देवकर यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना रिंगणात उतरवले.
रेश्मा देवकर या वेहरगावच्या माजी सरपंच असून एकवीरा देवस्थानच्या मानद विश्वस्त आहेत. त्यांच्या पती राजू देवकर यांनी परिसरातील इंदिरा झोपडपट्टीचे गायरान नियमित करून देणे तसेच रस्त्यांचे काँक्रीटीकरण यांसारखी विकासकामे केल्याने मतदारसंघात देवकर कुटुंबाची मजबूत पकड आहे. त्यामुळे त्यांचा विजय निश्चित असल्याची चर्चा रंगली होती.
मतमोजणीत रेश्मा देवकर यांना सात हजार २३४ मते, तर रंजना गायकवाड यांना सहा हजार ६७९ मते मिळाली. त्यामुळे देवकर यांनी सुमारे दीड हजार मतांच्या फरकाने विजय मिळवत राष्ट्रवादीचा झेंडा फडकावला.

TDB26B04598

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com