

तळेगाव दाभाडे, ता. ४ ः तुकाराम नगर परिसरातील पॅरामाऊंट इमारतीत रविवारी रात्री मधमाशांचे पोळे अचानक उधळले गेले. अनेक नागरिकांना मधमाशा चावल्याने थोडा वेळ भितीचे वातावरण होते. त्यात एका ज्येष्ठ महिलेला मधमाशा चावल्या. ललिता भोकरे (वय ५३) असे त्यांचे नाव आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका बोलाविण्यात आली, तेव्हा रुग्णवाहिका चालक राजू तसेच अन्य एक तरुण अनिश गराडे यांनाही मधमाशा चावल्या. दरम्यान, वन्यजीव मावळ संस्थेचे संस्थापक नीलेश गराडे यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी राजू सय्यद, श्रीयश भेगडे, भास्कर माळी यांच्या मदतीने ललिता यांना रुग्णवाहिकेत बसविले. त्यानंतर ललिता यांना सोमाटणे येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथील डॉक्टरांनी उपचारासाठी सुमारे ३५ हजार रुपयांची मागणी केली. त्यांचे पती गणपत यांनी आपण केशकर्तनालयात काम करीत असल्याने आर्थिक परिस्थिती बेताची असल्याचे सांगून इतकी रक्कम भरणे शक्य नसल्याचे स्पष्ट केले. त्यांच्याजवळ आठशे रुपये होते. तेवढेच उपचार करून त्यांनी पत्नीला घरी आणले.
-----
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.