

तळेगाव, ता. १३ : आंबी येथील आरएमके औद्योगिक संकुल क्रमांक तीनमध्ये ‘इनर्जी इन मोशन’ कंपनीच्या इलेक्ट्रिक ट्रक उत्पादन प्रकल्पाचे बुधवारी (ता.१४) दुपारी बारा वाजता उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय अवजड उद्योग व पोलाद मंत्री एच. डी. कुमारस्वामी यांच्या हस्ते हा सोहळा होणार आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांची प्रमुख उपस्थिती या कार्यक्रमाला असणार आहे.
याबाबतची माहिती आरएमके समुहाचे चेअरमन रामदास काकडे, एनर्जी इन मोशनचे व्यवस्थापकीय संचालक नरेंद्र मुरकुंबी, उत्पादन प्रमुख महेश केसकर यांनी दिली. तर, आरएमके समुहाचे व्यवस्थापकीय संचालक रणजीत काकडे हे कार्यक्रमाचे निमंत्रक आहेत.
‘इनर्जी इन मोशन’ कंपनीचा ५५ टन क्षमतेचा ‘अश्वा’ विद्युत ट्रक बॅटरी बदलण्याच्या तंत्रज्ञानावर आधारित आहे. अवघ्या सात मिनिटांत बॅटरी बदलून हा ट्रक पुन्हा प्रवासासाठी सज्ज होतो. त्यामुळे डिझेलचा वापर, प्रदूषण आणि वाहतुकीतील वेळ कमी होण्यास मदत होणार आहे. जवाहरलाल नेहरू बंदर प्राधिकरणाला (जेएनपीटी) या ट्रकचा पुरवठा केला जात असून, मुंबई-पुणे मार्गावरही हे ट्रक लवकरच धावणार आहेत, असे या वेळी सांगण्यात आले.
मावळात अडीच हजार कोटींची गुंतवणूक
मावळ तालुक्यात आरएमके समूहाने चालू वर्षात अडीच हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली असून, त्यातून चार हजार थेट रोजगार निर्माण झाले आहेत. मागील सात वर्षांत समूहाने दहा हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक करून दहा हजारांहून अधिक रोजगार उपलब्ध करून दिले आहेत, अशी माहिती समूहाचे अध्यक्ष रामदास काकडे यांनी दिली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.