कलापिनीत घडतेय सुसंस्कारित पिढी ः सुप्रिया शिंदे

कलापिनीत घडतेय सुसंस्कारित पिढी ः सुप्रिया शिंदे
Published on: 

तळेगाव दाभाडे, ता. २७ : ‘आजच्या धावपळीच्या काळात मुलांवर संस्कार करण्यासाठी पालकांना पुरेसा वेळ मिळत नाही. मात्र, कलापिनी सांस्कृतिक केंद्र सुसंस्कारित पिढी घडविण्यासाठी प्रयत्नशील असून, येथील विविध उपक्रम कौतुकास्पद आहेत. असे प्रतिपादन तळेगाव दाभाडे नगर परिषदेच्या उपमुख्याधिकारी सुप्रिया शिंदे यांनी केले.
कलापिनी सांस्कृतिक केंद्रात फोर्ब्स फाउंडेशनच्या सहकार्याने उभारलेल्या विद्युत जनित्र संचाचा उद्घाटन सोहळा आणि कलापिनी महिला मंचातर्फे आयोजित कर्तृत्ववान महिलांच्या नवदुर्गा सन्मान सोहळ्यात त्या बोलत होत्या. यावेळी फोर्ब्स फाउंडेशनच्या बिना जोशी, सुनीता कुवळेकर यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते.
सोहळ्यात मृणाल कुलकर्णी, अर्चना काटे, मानसी भावसार, निर्मला जाधव, रमी गुडगेरी, स्नेहलता साठे, सीताबाई चोपडे, अनघा कुलकर्णी आणि अमृता पाटोळे यांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात मीरा भरड हिने ‘दुर्गे दुर्गटभारी’ या आरतीवर नृत्य सादर केले. सुचेता कुलकर्णी व सहकाऱ्यांनी जोगवा आणि गोंधळ सादर केला. अमृता पाटोळे हिने तलवारबाजी आणि लाठी-काठीची प्रात्यक्षिके दाखविली. विद्युत जनित्र संचाच्या उभारणीत योगदान देणाऱ्या रमेश थिटे, मंदार थिटे, महेश सोनपावले आणि केदार अभ्यंकर यांचाही सत्कार करण्यात आला. डॉ. अनंत परांजपे यांनी संस्थेच्या उभारणीत योगदान देणाऱ्यांविषयी कृतज्ञता व्यक्त केली. प्रास्ताविक व स्वागत अंजली सहस्रबुद्धे यांनी केले. हेमंत झेंडे यांनी मान्यवरांचा परिचय करून दिला. अशोक बकरे यांनी आभार मानले. लीना परगी, ऋचा पोंक्षे आणि राखी भालेराव यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com