रोटरी सिटीतर्फे सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रोटरी सिटीतर्फे सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन
रोटरी सिटीतर्फे सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन

रोटरी सिटीतर्फे सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन

sakal_logo
By

तळेगाव स्टेशन, ता. ३: रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटीच्यावतीने येत्या रविवार (ता.७) मे सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. १ जानेवारीला सकाळी ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिरात जिल्हा संस्थापक प्रांतपाल नितीन ढमाले, रोटरी सिटीचे अध्यक्ष दीपक फल्ले, प्रकल्पप्रमुख विलास काळोखे, दिलीप पारेख, सुरेश शेंडे, संतोष शेळके, किरण ओसवाल यांच्या हस्ते नारळ वाढवून, पोस्टर अनावरणाने नोंदणीचा शुभारंभ करण्यात आला.

या सामुदायिक विवाह सोहळ्यात लग्नगाठ बांधणाऱ्या जोडप्यांना रोटरीतर्फे मोफत गॅस शेगडी, गॅस सिलेंडर, संसारोपयोगी भांड्यांचा संच, संपूर्ण पोशाख तसेच भाग्यवान वधू-वरास तीन मोबाईल भेट सोडतीद्वारे काढण्यात येणार आहे. गोदान देखील करण्यात येणार आहे. वधूंना सोन्याची नथ भेट देण्यात येणार आहे. वधू-वराची भव्य शोभायात्रा, वधूवरांना विवाह प्रमाणपत्र, वऱ्हाडी लोकांसाठी अल्पोपाहार व भोजनाची व्यवस्था हळदी, साखरपुडा व लग्नासाठी भव्य प्रशस्त मंडप अशा सुविधा रोटरी क्लबच्या वतीने देण्यात येणार आहेत. मावळातील गोरगरीब, दिन दुबळ्या, आदिवासी भागातील नागरिकांनी, गरजू पालकांनी आपल्या विवाहेच्छूक मुलामुलींच्या लग्नासाठी आगाऊ नोंदणी करण्याचे आवाहन क्लबचे अध्यक्ष दीपक फल्ले यांनी केले आहे.