रेल्वेत प्रसूत झालेल्या महिलेला तळेगावात त्वरित उपचार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रेल्वेत प्रसूत झालेल्या महिलेला 
तळेगावात त्वरित उपचार
रेल्वेत प्रसूत झालेल्या महिलेला तळेगावात त्वरित उपचार

रेल्वेत प्रसूत झालेल्या महिलेला तळेगावात त्वरित उपचार

sakal_logo
By

तळेगाव स्टेशन, ता. ११ ः मुंबई- हैदराबाद एक्स्प्रेस रेल्वेगाडीत प्रसूत झालेल्या महिलेसह तिच्या बाळाला मंगळवारी (ता. १०) सायंकाळी तळेगाव दाभाडे रेल्वे स्थानकावर रेल्वे प्रशासनाने अधिकारी, कर्मचाऱ्यांसह सामाजिक कार्यकर्त्यांनी दाखवलेल्या सजगतेमुळे त्वरित वैद्यकीय मदत मिळाली. हैदराबाद एक्स्प्रेसच्या मोटरमनने गार्डद्वारे वॉकी-टॉकीच्या साह्याने एका प्रवासी महिलेला प्रसूती कळा येत असल्याचे सांगत तळेगाव रेल्वे स्टेशनला वैद्यकीय मदत मागितली. दरम्यान, गाडी तळेगाव स्टेशनला पोचेपर्यंत रेल्वेगाडीतच महिलेची सुखरूपपणे नैसर्गिक प्रसूती झाली. मिळालेल्या सूचनेनुसार, रेल्वेचे अधिकारी संजय पाचपुते यांनी अगोदरच रुग्णवाहिका तयार ठेवली होती. प्रसूत महिलेस तिच्या बाळासह रेल्वे डब्यातून खाली उतरवून स्ट्रेचरवर झोपवत, त्वरित तळेगाव जनरल हॉस्पिटलला नेण्यात आले. सामाजिक कार्यकर्त्या शैला संजय पाचपुते, तानाजी गडकर, रेल्वेचे अधिकारी अभिषेक कुमार, सुजित कुमार, थॉमस राजू आणि जनरल हॉस्पिटल कर्मचारी वर्गाने याकामी विशेष सहकार्य केले. जनरल हॉस्पिटलमध्ये तपासणीनंतर महिला आणि बाळाची तब्येत ठीक असल्याचा निर्वाळा दिल्यानंतर महिलेच्या नातेवाइकांसह या आपत्कालीन परिस्थितीत मदत करणाऱ्या सर्वांचा जीव भांड्यात पडला.