Thur, March 23, 2023

तळेगावात उद्या
सायक्लोथोन जॉय राइड
तळेगावात उद्या सायक्लोथोन जॉय राइड
Published on : 17 February 2023, 10:19 am
तळेगाव स्टेशन, ता. १७ : रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे सिटी, ॲथलेटिक सोसायटी आणि वास्तू डेव्हलपर्स यांच्यावतीने
रोटरी सिटी सायक्लोथोन जॉय राईडचे रविवारी (ता. १९) सकाळी साडे सातला मारुती मंदिर चौकात आयोजन करण्यात आले आहे.
माजी मंत्री संजय भेगडे यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन होईल. रोटरीच्या जिल्हा प्रांतपाल शीतल शाह, आकाश चिकाटे आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. बक्षिस म्हणून सहभागी सायकलस्वारांसाठी तीन सायकली सोडत पद्धतीने दिल्या जातील. उत्कृष्ट निसर्ग सायकल सजावट स्पर्धेसाठी तीन सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे. महाराष्ट्र केसरी विजेता पहिलवान शिवराज राक्षे याचा सत्कार या कार्यक्रमात करण्यात येणार आहे, अशी माहिती रोटरी सिटीचे अध्यक्ष दीपक फल्ले यांनी दिली.