Tue, March 28, 2023

झाड अंगावर पडल्याने
दुचाकीस्वार जखमी
झाड अंगावर पडल्याने दुचाकीस्वार जखमी
Published on : 1 March 2023, 3:20 am
तळेगाव स्टेशन, ता. १ : तळेगाव-चाकण महामार्गावर कोटेश्वरवाडी फाट्यानजीक बुधवारी (ता. १) रस्त्याकडेचे कुजलेले झाड अंगावर पडून, दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. तसेच वाहतूक विस्कळित झाली. बुधवारी (ता. १) सकाळी साडेअकराच्या दरम्यान माळवाडीकडून इंदोरीकडे जाणाऱ्या तळेगाव स्टेशन येथील शंतनू सुरेश वाघमारे (वय २४, तळेगाव स्टेशन) या तरुणाच्या दुचाकीवर मोठे झाड अचानक कोसळले. सुदैवाने दुचाकीच्या समोरील भागावरून फांद्या निसटल्यामुळे शहा बाजूला फेकला गेल्याने बचावला. मात्र, अपघातात त्याच्या डोक्याला मार लागला आहे तसेच हात मोडल्याने तो गंभीर जखमी झाला आहे.