ढोरवाडयाचे नामकरण वीरशैव ककय्या महाराज नगर करा

ढोरवाडयाचे नामकरण वीरशैव ककय्या महाराज नगर करा

‘ढोरवाड्याचे नामकरण
वीरशैव ककय्या महाराज नगर करा’

तळेगाव स्टेशन, ता. १ : शासन सूचनानुसार तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील ढोरवाड्याचे नामकरण संत रोहिदासनगर असे न करता वीरशैव कक्कया महाराज नगर असे करावे,अशी मागणी ढोर समाज बांधवांनी तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी एन. के. पाटील यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
तळेगाव दाभाडे नगर परिषदेमार्फत प्रसिद्ध करण्यात महाराष्ट्र सरकारच्या निर्णयानुसार राज्यातील अनेक गावातील तसेच वस्त्यांमध्ये जातिवाचक नावे वगळून त्याऐवजी थोर महापुरुष किंवा लोकशाही मूल्यांशी निगडित असे नामकरण देण्यास परवानगी दिलेली आहे. त्यानुसार ढोरवाड्याचे नामकरण संत रोहिदासनगर असे करण्याचे प्रशासनाचे नियोजन आहे. मात्र, ढोरवाड्यातील रहिवाशांनी याबाबत हरकती नोंदवत या नामकरणाला विरोध केला आहे. तळेगावातील ढोरवड्याचे नामकरण वीरशैव कक्कया महाराज नगर करावे, या मागणीचे निवेदन मुख्याधिकारी एन. के. पाटील रवींद्र शिंदे यांनी मुख्याधिकारी एन. के. पाटील यांना दिले आहे. माजी नगराध्यक्ष राजेंद्र पोळ, माजी नगरसेवक अरुण माने, रवींद्र शिंदे, किशोर कवडे, रामचंद्र शिंदे, संतोष शिंदे, ऋषिकेश सोनटक्के, रोहित शिंदे, अभिजित सोनटक्के, रोहित शिंदे, शिवलिंग बोराडे, सुरेश शिंदे, मिथुन कवडे, शेखर शिंदे, राजू सोनटक्के यांच्यासह ढोर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निवेदनावर नक्कीच विचार केला जाईल, असे आश्वासन मुख्याधिका-यांनी निवेदनकर्त्यांना दिले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com