
चाकण ‘एमआयडीसी’त सायकल दिन उत्साहात केस न्यू हॉलंड कंपनीचा पुढाकार --------------------------------
तळेगाव स्टेशन, ता. ४ : जागतिक सायकल दिनानिमित्त शनिवारी (ता. ३) चाकण ‘एमआयडीसी’मधील अग्रणी कृषी उपकरणे निर्मिती करणाऱ्या केस न्यू हॉलंड कंपनीच्यावतीने सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. आधुनिकतेच्या जमान्यात स्वयंचलित वाहनांचा वापर सुरु झाला आणि विनाइंधन, विना प्रदूषण वाहन असलेली सायकल अडगळीत गेली. दैनंदिन कामातला वेळ वाचविण्यासाठी लोकांनी सायकल चालवणे कमी केले. मात्र, अंतर कापण्याबरोबरच सायकल चालवण्याचे इतरही अनेक फायदे आहेत. सायकल हा शरीरासाठी सर्वोत्तम व्यायाम मानला जातो. पर्यावरणाला प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी सायकल उपयुक्त आहे. या पार्श्वभूमीवर औद्योगिक क्षेत्रातील कामगार, कर्मचाऱ्यांमध्ये सायकलच्या वापराबाबत जनजागृती करण्याबरोबरच सायकलच्या फायद्यांची जाणीव करून देण्याच्या उद्देशाने सायकल रॅलीचे केस न्यू हॉलंड व्यवस्थापनातर्फे आयोजन करण्यात आले होते.
रॅलीच्या नियोजनासाठी पुढाकार घेत शंकर गाढवे आणि गगन यांनी नियमित सायकल चालवण्यामुळे होणारे विविध फायदे कर्मचाऱ्यांना सांगितले.
आदेश कालेकर, बसवराज पाटील, अशोक शिंदे, जालिंदर भडके, नवनाथ रूपनर यांच्यासह चाकण ‘एमआयडीसी’ औद्योगिक क्षेत्रातील विविध कंपन्यांच्या मनुष्यबळ विकास विभागाच्या प्रतिनिधींनी रॅलीत सहभाग नोंदवला.आस्थापना व्यवस्थापक किशोर देवळे यांच्या मार्गदर्शनाखाली केस न्यू हॉलंडच्या कर्मचारी वर्गाने नियोजन केले. मानव संसाधन विभाग प्रमुख शीतल साळुंके यांनी सूत्रसंचालन केले. संदीप पवार, प्रशांत बेलवटे यांनी आभार मानले.
फोटो ओळी : चाकण एमआयडीसी : जागतिक सायकल दिनानिमित्त केस न्यू हॉलंडमध्ये आयोजित सायकल रॅलीमध्ये सहभागी अधिकारी आणि कर्मचारी.
फोटोः 04310