छापील स्लीप नसल्याने मतदारांची दमछाक
मतदार याद्यांमधील त्रुटींमुळे अनेकजण मतदानापासून वंचित

छापील स्लीप नसल्याने मतदारांची दमछाक मतदार याद्यांमधील त्रुटींमुळे अनेकजण मतदानापासून वंचित

तळेगाव स्टेशन, ता. १३ : मावळ लोकसभा मतदार संघातील तळेगाव दाभाडे आणि स्टेशन विभागात शांततेत मतदान पार पडले. निवडणूक आयोगाच्या यंत्रणेतील त्रुटींमुळे आणि छापील स्लीप आगाऊ न मिळाल्याने आपली नावे आणि मतदान केंद्र शोधताना मतदारांची चांगलीच दमछाक झाली. मतदान केंद्रांवर मोबाईल फोन नेण्यास बंदी असल्याने डिजिटल स्लीपचा संदर्भ न घेता आल्यामुळे अनेकांना बराच वेळ ताटकळत थांबून, शेवटी मतदानापासून वंचितच राहावे लागले.
मतदान करण्यासाठी बरेच जण उत्साहाने अगदी सकाळी सातलाच केंद्रावर हजर होते. मात्र, केंद्रातील मतदान यंत्रणेची तयारी झालेली नसल्याने मतदारांना बराच वेळ विनाकारण ताटकळत थांबावे लागले. तळेगाव स्टेशन विभागातील इंद्रायणी विद्या मंदिर, संत ज्ञानेश्वर विद्यालय (गुलाबी शाळा), सरस्वती विद्या मंदिर आदी मुख्य मतदान केंद्रांवर सकाळी अकरापर्यंत मतदारांनी केलेली गर्दी दुपारी ऊन वाढल्यानंतर बऱ्यापैकी कमी झाली. मतदान केंद्रांबाहेर मोबाईलच्या आधारे मतदारांचे नाव शोधून राजकीय पक्षांच्या बुथवर प्रिंटेड स्लीप दिल्या जात असल्या तरी मतदार यादीत नाव नसणे, पत्ता स्थलांतरित होणे, डिजिटल स्लीपमधील स्पेलिंग मिस्टेकमुळे नाव आणि केंद्र शोधताना मतदारांना मनस्ताप सहन करावा लागला. ऐनवेळी मतदार यादीतील नावे शोधण्यासाठी बुथवरील कार्यकर्त्यांसह बऱ्याच मतदारांची पळापळ झाली. गाव विभागातील काही मतदारांच्या स्लीपवर लायन्स क्लब, कडोलकर कॉलनी मतदान केंद्र म्हणून छापून आले होते. मात्र, प्रत्यक्षात तिथे केंद्रच नव्हते. मतदारांना इतर ठिकाणी नावे शोधून मतदान करावे लागले. मतदान केंद्रावर मोबाईल नेण्यास बंदी असल्याने डिजिटल व्होटर स्लीप कुचकामी ठरली. अनेक मतदारांची नावे गायब झालेली दिसली. मात्र, बऱ्याच हयात नसलेल्या व्यक्तींची नावे मतदार यादीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला.

बंदोबस्तासाठी परराज्यातील पोलिस
यंदा प्रथमच तमिळनाडू पोलिस, कर्नाटक राखीव पोलिस दल यांचे जवान येथे तैनात करण्यात आले होते. तळेगाव-चाकण रस्त्यावरील संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयातील मतदान केंद्रावर तमिळनाडूतील पोलिस बंदोबस्तावर होते. स्थानिक पिंपरी चिंचवड आयुक्तालयाचे स्थानिक पोलिस जोडीला असले तरी मराठी- हिंदी भाषा येत नसल्याने पार्किंग बंदी आणि थांबण्यास मज्जाव करताना स्थानिक नागरिकांना समजावण्यात त्यांच्या नाकी नऊ आले. बरेच पोलिस केवळ हावभावाने नागरिकांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करीत होते.
---------------------------
माजी आमदारच मतदानापासून वंचित
मतदार यादीत नाव नसणे, चुकीची नावे अशा अनेक चुकांमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्यासह अन्य काही मतदारांना मतदान न करताच घरी परतावे लागले. त्यामुळे, निवडणूक प्रशासनाच्या कारभारावर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. ------------------------------------------------------------


तळेगाव स्टेशन ः संत ज्ञानेश्वर प्राथमिक विद्यालयातील मतदान केंद्रावर तैनात तमिळनाडू पोलिस.
फोटोः 05021, 05022

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com