तळेगावचे मुख्याधिकारी 
मद्यधुंदावस्थेत असल्याचे सिद्ध
‘ड्रंक अँड ड्राइव्ह’प्रकरणी न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल

तळेगावचे मुख्याधिकारी मद्यधुंदावस्थेत असल्याचे सिद्ध ‘ड्रंक अँड ड्राइव्ह’प्रकरणी न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा अहवाल

तळेगाव स्टेशन, ता. ७ : तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी एन. के. पाटील यांच्या रक्तचाचण्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे अपघातसमयी ते मद्यधुंद अवस्थेत असल्याचे सिद्ध झाले आहे.
गेल्या शनिवारी (ता. १) दुपारी तळेगाव स्टेशन चौक ते जिजामाता चौक दरम्यानच्या वर्दळीच्या रस्त्यावर पाटील यांनी बेदरकारपणे मोटार चालवून दोन वाहनांना ठोकर दिली होती व त्यानंतर ते पळून गेले होते. याप्रकरणी नुकसानग्रस्त गाडीमालक सिद्धाराम इरप्पा लोणीकर यांच्या फिर्यादीवरून, पाटील यांच्या विरोधात तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात भा.दं. वि.कलम २७९,३३६,४२७ सह मोटार वाहन कायद्यानुसार कलम १८४,१८५ नुसार १३४ (ब) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यासंदर्भात पाटील यांच्या वैद्यकीय तपासणीचा न्यायवैद्यक विज्ञान प्रयोगशाळेचा अहवाल पोलिस ठाण्यास गुरुवारी सायंकाळी प्राप्त झाला. हा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने आता याप्रकरणी पाटील यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रदीप रायण्णावर यांनी दिली.

मोटार वाहन कायदा काय सांगतो?
मोटार वाहन कायदा, १९८८ च्या कलम १८५ अन्वये रक्तातील मद्याची पातळी (ब्लड अल्कोहोल कॉन्सेंट्रेशन-एबीसी) ही १०० मिलिलिटर रक्तात ३० मिलीग्रॅमपेक्षा जास्त असल्यास गुन्हा आहे. दारू पिऊन किंवा अमली पदार्थाच्या नशेत वाहन चालविल्यास पहिल्या अपराधाबद्दल ६ महिने कैद किंवा दोन हजार रुपये दंड किंवा दोन्हीही शिक्षा होऊ शकतात. तसेच वाहन परवाना निलंबित किंवा रद्द होतो.
अपघात घडल्यास चालकाची कर्तव्ये कलम-१३४ (ब) नुसार, अपघातास कारणीभूत झालेल्या वाहन चालकाने जखमींना ताबडतोब वैद्यकीय उपचारासाठी दवाखान्यात घेऊन जाणे बंधनकारक आहे. तसेच जवळच्या पोलिस ठाण्यामध्ये त्वरित खबर देणे आवश्यक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com