तळेगाव एमआयडीसी पोलिसांचा गावठी दारु भट्टीवर छापा
आंबीतील दारू भट्टीवर
पोलिसांचा छापा
सात हजार लिटर गुळमिश्रीत कच्चे रसायन नष्ट
तळेगाव स्टेशन, ता. २ : तळेगाव एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने आंबी (ता. मावळ) हद्दीतील तळेगाव एमआयडीसी लगतच्या ओढ्याच्या कडेला अवैधपणे सुरु असलेल्या दारु भट्टीवर मंगळवारी (ता. १) रात्री अचानक छापा मारुन, तब्बल ७ हजार लिटर गूळ मिश्रित कच्चे रसायन आणि ७० लिटर गावठी हातभट्टी दारू नष्ट केली.
तळेगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक रणजित जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोलिस हवालदार अनंत रावण, स्वराज साठे, विनायक शेरमाळे, भीमराव खिलारे, रमेश घुले, दीपाली कुंभार यांच्या पथकाने मंगळवारी (ता. १) रात्री नऊच्या दरम्यान तळेगाव एमआयडीसी फ्लोरिकल्चरल पार्कच्या पश्चिमेला असलेल्या ओढ्याकडेला सुरु असलेल्या गावठी दारू भट्टीवर छापा टाकला. पोलिस पथक येत असल्याचा सुगावा लागताच भट्टी चालविणाऱ्या महिलेने तेथून पोबारा केला. दरम्यान लोखंडी टाकीत अंदाजे ७ हजार लिटर गावठी हातभट्टी तयार करण्याकरीता लागणारे गूळ मिश्रित कच्चे रसायन आणि दोन पांढ-या रंगाच्या कॅन्डमध्ये भरलेली ७० लिटर तयार गावठी हातभट्टीची दारू पोलिसांना आढळून आली. पंचनाम्यासाठी नमुने घेतल्यानंतर साडेतीन लाख रुपये किमतीचे कच्चे रसायन, सात हजार रुपये किमतीची गावठी हातभट्टी दारू आणि दारू बनविण्याचे साहित्य असा एकूण ३ लाख ५७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जमिनीवर ओतून जागेवरच नष्ट केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.